Wadgaon : उघड्या विद्युत डी पी वायरचा शॉक लागून बिबट्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : उघड्या विद्युत डी पी वायरचा शॉक लागून बिबट्याचा मृत्य झाल्याची दुर्दैवी घटना वडगाव (Wadgaon) काशिमबेग गावात घडली. हे गाव मंचर शहरापासून सुमारे 7 काम लांब आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव काशिमबेग पद्मावती मंदिराजवळ असलेल्या वयकर मळ्यातील शेतकरी बाजीराव वयकर यांच्या शेताच्या बांधावर हि घटना 11 जुलै रोजी घडली. या शेताच्या बांधावर असलेल्या डी पीच्या उघड्या वायरचा विद्युत झटका लागल्याने बिबट्याचा मृत्यू झाला. या बिबट्याने शिकार केलेली शेळीही त्या ठिकाणी मृत अवस्थेत सापडली. मृत बिबट्याचे वय अंदाजे 2.5 वर्षे होते.

Sinhagad : सिंहगडावर रस्त्यावर पडलेल्या हायटेन्शन वायरचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

दोन दिवसांपूर्वी वायकर मळा येथील शेतकरी दशरथ वयकर यांची शेळी मिळत न्हवती. बिबट्याने तिची शिकार केली व झाडाच्या मागे घेऊन जाताना रात्रीच्या वेळी त्याला जोरात शॉक लागून त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याने पकडलेल्या शेळीचा देखील त्याच्याबरोबर मृत्यू झाला. काल वायकर मळा येथील शेतकरी तेजस वायकर, संतोष वायकर व इतर ग्रामस्थ्यांना ही घटना कळली. त्यांनी महावितरण व वन विभागास (Wadgaon) याबाबत माहिती दिली.

महावितरणचे व वन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. वनविभागाचे वनपाल एस. एल. गायकवाड, वन रक्षक पूजा कांबळे व इतर कर्मचारी तेथे पोहोचले व त्यांनी पंचनामा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.