Kalapini : कलापिनीच्या बालभवनची दिंडी उत्साहात!

एमपीसी न्यूज : दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कलापिनीचे (Kalapini) प्रांगण आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या नामघोषाने दुमदुमून गेले. कलापिनी बालभवन, कुमारभवन, स्वास्थ योग आणि महिलामंच या सर्वांच्या सहभागाने दिंडीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. बालभवनची मुले वारक-यांची, विविध संतांची वेशभूषा करून हातात टाळ घेऊन उत्साहात आली होती. वैदेही देशमुख रुक्मिणी आणि अथर्व डोके विठ्ठलाच्या वेशभूषेत छान दिसत होते. सर्व स्वास्थ्य योगी, महिला मंचच्या सर्व सदस्या, कुमारभवनची मुले आणि पालक अतिशय उत्साहात आनंदाने या दिंडीत सहभागी झाले होते.

कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर,आणि प्रमुख पाहुणे कलापिनीचे खजिनदार श्रीशैल गद्रे यांच्या हस्ते नटराज पूजन आणि पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे तसेच सचिव अशोक बकरे उपस्थित होते.

बालभवनच्या मुलांनी प्रार्थना, भजन व विठ्ठलाचे गाणे सादर केले. त्यानंतर स्वास्थ योगींनी भजन,रिंगण, फूगड्या असे विविध प्रकार सादर केले. बालभवनच्या मुलांचे आणि प्रशिक्षिकांचे रिंगण पण छान झाले. महिलामंचच्या महिलांनीही रिंगण आणि फूगड्यात सहभाग घेतला. शेवटी कुमारभवनचे प्रशिक्षक व संदीप मनवरे या नवदांपत्याच्या हस्ते विठ्ठल-रखूमाईची आरती झाली आणि दींडीला सुरवात झाली.

कुमारभवनची मुले पालखीचे भोई झाली होती. विठ्ठलाचा आणि ज्ञानोबा-तुकोबांचा गजर करत दिंडी सोहळा संपन्न झाला. शेवटी पठनं विपुलं या श्लोकाने दिंडी सोहळ्याची सांगता झाली व सर्वांना प्रसाद वाटप झाले.

कार्यक्रमाचे (Kalapini) उत्तम नियोजन बालभवन प्रमुख मधुवंती रानडे, नियोजन प्रमुख अनघा बुरसे, ज्योती ढमाले, वंदना चेरेकर, मनिषा शिंदे,विशाखा देशमुख आणि माधवी एरंडे यांनी केले. तसेच कुमारभवन, महिलामंच, स्वास्थ योग आणि बुरसे, रानडे यांच्या सहकार्याने दिंडी सोहळा अतिशय उत्तम रीतीने पार पडला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.