Pune news : ‘स्वरोन्मेष’ कार्यक्रमात नाशिकच्या दसककर भगिनींनी साधला रसिक पुणेकरांशी स्वर-सुसंवाद

एमपीसी न्यूज – शास्त्रीयउपशास्त्रीय संगीतफ्युजन, (Pune news) सुगम संगीत,गायन-वादन यांच्या व्होकल हार्मनीतून (स्वर-सुसंवाद) अनोखा स्वराविष्कार सादर करीत दसककर भगिनींनी पुणेकर रसिकांची मने जिंकली.  

उत्तुंग परिवार ट्रस्ट पुणे शाखेतर्फे आयोजित ‘स्वरोन्मेष’ या कार्यक्रमात नाशिकच्या अश्विनी, गौरी, ईश्वरी आणि सुरश्री या दसककर भगिनींनी आपली अनोखी आणि सुरीली संगीत कला सादर करीत रसिकांना संगीताच्या जादुई दुनियेची सफर घडविली. त्यांना सुजीत काळे (तबला), श्रेयश दीक्षित (टाळ) यांनी समर्पक साथ केली. कार्यक्रमाचे निवेदन ऋचा दीक्षित-मुळे यांनी केले. कोथरूड येथील एम. ई. एस. सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दसककर भगिनींना संगीत कलेचा वारसा घरातूनच मिळाला आहे. आजोबा ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संवादिनीवादक पं. प्रभाकर दसककर, काका संगीततज्ज्ञ माधव दसककर तसेच (Pune news) आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संवादिनी वादक पं. सुभाष दसककर यांच्याकडे तसेच जयपूर, ग्वाल्हेर, किराणा घराण्याच्या समग्र गायिका विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर व विदुषी मंजिरी असनारे-केळकर यांच्याकडे त्यांचे सांगीतिक शिक्षण झाले आहे.

Virasat Festival : ‘विरासत’ महोत्सवाला सुरुवात

कार्यक्रमाची सुरुवात गुरूंना वंदन करून ‘गिरीधर के गोधन गाये प्रभू को अरज सुनाये’ या बंदिशीने झाली. त्यानंतर ईश्वरी दसककर हिने संगीत दिलेल्या ‘त दोम ता ना धीम धीम ते  रे नाम’ या रचनेने कार्यक्रमात रंगत आणली. भूप रागात सादर केलेला संत नामदेवांचा अभंग आणि हरिपाठातील रचनांना टाळ्यांची दाद मिळाली. त्यानंतर सादर केलेल्या हार्मनी स्वरूपातील ‘असा बेभान हा वारा’  (Pune news) या गाण्याने तर वन्स मोअर मिळविला. ‘ही वाट दूर जाते’, ‘पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले’, ‘ये राते ये मौसम नदी का किनारा’  या गाण्यांनी रसिक गतकाळात रममाण झाले.  फ्युजन प्रकारातील राग देसमधील ‘मोसो चैन नही आवे’ या गीताने कार्यक्रमात रंगत आणली.

ज्येष्ठ संगीततज्ज्ञ आणि संवादिनीवादक पं. प्रभाकर दसककर यांनी संगीतबद्ध केलेल्या हरिपाठीतील काही रचना दसककर भगिनींनी सादर करून रसिकांना भक्तिरसाची अनुभूती दिली. जोग, गावती, मालकंस, चारुकेशी, गौड मल्हार यासह विविध रागातील हार्मोनियमवर सादर केलेल्या (Pune news) रचना रसिकांच्या मनात घर करून गेल्या. या वेळी ज्येष्ठ संगीतज्ञ डॉ. पंडित विकास कशाळकर, ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर, माधव खाडीलकर, ओंकार खाडीलकर तसेच अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.