Virasat Festival : ‘विरासत’ महोत्सवाला सुरुवात

एमपीसी न्यूज : रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या कथक नृत्याविष्कार, तसेच व्हायोलिनची सुरीली जुगलबंदी याने विरासत महोत्सवाला (Virasat Festival) शनिवारी सुरुवात झाली. चंदिगड येथील प्राचीन कला केंद्रातर्फे भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्यावर आधारित दोन दिवसीय विरासतमहोत्सवाचे आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले आहे.

प्राचीन कला केंद्र ही संस्था चंदिगड येथील असून गेल्या 35 वर्षांपासून देशात महोत्सवाचे आयोजन करीत आहे. त्याचा एक भाग म्हणून येथे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. आजच्या उद्घाटन समारंभात जेष्ठ नृत्य कलाकार शमा भाटे, सुचेता भिडे चाफेकर, मनीषा साठे, गायक उदय भवाळकर यांचा मानपत्र, उपरणे असा नक्षत्र सन्मान प्रदान करुन गौरव करण्यात आला. संस्थेच्या संस्थापिका आणि जेष्ठ नृत्य कलाकार शोभा कोसर, तसेच संस्थेचे सचिव सजल कोसर, दिलीप पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना सुचेता भिडे चाफेकर यांनी सांगितले की, कोणताही पुरस्कार हा उत्साहवर्धक असतो. यातून पुढील कार्याला प्रेरणा मिळते. (Virasat Festival) दिलीप पाटील म्हणाले, भारतीय  संगीत, नृत्य कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी शाळांमध्ये किमान एक तास कलेचे शिक्षण मुलांना मिळावे.

Pimpri crime : दत्तक पुत्राचा छळ करून त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी पालकांवर गुन्हा

पंडिता रोहिणी भिडे यांच्या शिष्या आभा वांबुरकर व त्यांच्या सहकलाकारांनी कथक नृत्याच्या विविध रचना अतिशय बहारदार आणि प्रभावीपणाने सादर केल्या. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात उस्फूर्त प्रतिसाद दिला. आभा वांबुरकर आणि त्यांच्या शिष्यांनी गणेश वंदनेनी  कार्यक्रमाची सुरुवात केली.

त्यानंतर रूप कथकचे सादरीकरण करून तत्कारातून त्रिधाराचे उत्तम दर्शन घडविले. (Virasat Festival) भक्त प्रल्हादावरील पंडिता रोहिणी भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या शरदिनी गोळे यांनी रचलेल्या कवित्ताच्या सादरीकणाने गोळे यांना आदरांजली वाहिली. मल्हार रागातील चैतन्य कुंटे रचित चतरंगच्या सादरीकरणाने रसिकांची वाहवा मिळविली.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित अतुलकुमार उपाध्ये आणि त्यांचे सुपुत्र तेजस उपाध्ये यांचे बहारदार व्हायोलिन वादन झाले. पंडित भास्करबुवा बखले व पंडित श्रीधर पार्सेकर यांची परंपरा पुढे चालविणारे पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी राग जोगमधील कोमल व शुद्ध निषाद यांचा खुबीने वापर करून राग खुलवत नेला. (Virasat Festival) गायकी व तंतकारी या दोहोंचाही सुंदर मिलाफ पंडित अतुलकुमार व तेजस उपाध्ये यांच्या वादनातून रसिकांना अनुभवायला मिळाला. काफी रागातील रचना सादर करून मैफलीचा समारोप केला. त्यांना रोहित मुजुमदार यांनी तबल्याची समर्पक साथ केली. सूत्रसंचालन रुतुजा फुलकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.