Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्याचा वेगळा अनुभव – मानव कांबळे 

एमपीसी न्यूज : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणे हा वेगळा अनुभव आहे असे स्वराज इंडियाचे मानव कांबळे यांनी सांगितले आहे.(Bharat Jodo Yatra) भारत जोडो यात्रीची सुरुवात 7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथे होऊन ती 12 राज्यातून प्रवास करत 3,500 किलोमीटर प्रवासानंतर जम्मू काश्मीर मध्ये संपणार आहे. ही यात्रा 150 दिवस चालणार आहे.

कांबळे या यात्रेत 2 दिवस सहभागी होते. त्यांनी या यात्रेत महाराष्ट्रामधील देगलूर येथून प्रवेश केला. देगलूर ते नांदेड पर्यंत  ते या यात्रेत सहभागी झाले होते.

याबाबत सांगताना, कांबळे म्हणाले की, “या यात्रेला सामान्य लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. देशात सध्या जातीय तेढ व तणाव निर्माण झाला आहे. तो दूर व्हावा. संविधानावर हल्ले वाढले आहेत त्यामुळे संविधान वाचावे. महिलांवर व गरिबांवर अत्याचार वाढले आहेत. याबाबत राहुल गांधी स्थानिक लोकांबरोबर या विषयांवर चर्चा करत आहेत, त्यांची मते जाणून घेत आहेत.या यात्रेला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नांदेड मधील नागरिकांना सभेनंतर विचारल्यावर त्यांनी सांगली की, यापूर्वी अशा प्रकारची सभा झाली नव्हती.”

Pune news : ‘स्वरोन्मेष’ कार्यक्रमात नाशिकच्या दसककर भगिनींनी साधला रसिक पुणेकरांशी स्वर-सुसंवाद

राहुल गांधींविषयी बोलताना कांबळे म्हणाले की, “राहुल गांधी यांच्याकडे सकारात्मक वृत्ती आहे. ते इंटेलिजन्ट आणि समजून घेणारे व्यक्तिमत्व आहे.(Bharat Jodo Yatra) त्यांच्याबरोबर असताना कळाले की प्रसार माध्यमांनी आणि विरोधकांनी त्यांची तयार केलेली त्यांची जी प्रतिमा आहे ती त्याला छेद देणारी आहे.

कांबळे हे स्वराज इंडिया मध्ये काम करतात. ते काँग्रेस पक्षाचे नाहीत पण तरीही ते या यात्रेत सहभागी झाले होते. तसेच इतरही सामाजिक संस्थेतील कार्यकर्ते देखील या यात्रेत सहभागी झाले होते. त्याविषयी बोलताना कांबळे म्हणाले की, ” मी काँग्रेस समर्थक नाही. आम्ही यापूर्वी काँग्रेस विरोधात काम केले आहे. पण आता हुकूमशाही वाढत आहे. देशातील फॅसीजम विरोधात एकत्र आले पाहिजे. आम्ही काँग्रेसमध्ये जाणार नाही. अल्पसंख्यांकांचे  लिंचिंग होत आहे. दलितांवरील  अत्याचार वाढत आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात एकत्र आले पाहिजे.”

ते पुढे म्हणाले की, ” संवैधानिक संसद जसे निवडणूक आयोग, ईडी व  सर्वोच्च न्यायालय सत्ताधाऱ्यांच्या ताब्यात आहेत. कर्तव्य म्हणून आम्ही काँग्रेस सोबत आहोत.(Bharat jodo yatra) उत्तर प्रदेश मधील ज्ञान वापी मस्जिद व अयोध्येतील राम मंदिर अशा धार्मिक विषयांना हात घालून धार्मिक भावना भडकविण्यात येत आहेत. दोन धर्मांमध्ये ते निर्माण करण्यात येत आहे. लोकांचे लक्ष मूलभूत प्रश्नांकडून दूर करण्यासाठी हे सर्व केली जात आहे. ”

राहुल गांधींबरोबर झालेल्या चर्चे विषयी सांगताना, कांबळे म्हणाले की, ” माझी त्यांच्याबरोबर अर्धा तास विविध विषयांवर चर्चा झाली. (Bharat jodo yatra) मी त्यांच्याबरोबर अपंगांच्या व झोपडपट्टी वासियांच्या समस्यांविषयी चर्चा केली. काँग्रेसने गेल्या वेळेच्या निवडणुकांमध्ये अपंगांना सहा हजार रुपये मासिक पेन्शन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना अपुरी रक्कम देण्यात आली. कांबळे यांच्या बरोबर प्रदीप पवार, गिरीश वाघमारे, इब्राहिम खान व इतर स्वराज्य इंडियाचे सदस्य भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.