Talawade : तळवडे गाव चौकात ट्रकखाली अडकून दोन महिलांचा अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – तळवडे (Talawade) येथील तळवडे गाव चौकामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन महिलांचा गॅस सिलेंडर वाहून नेणाऱ्या ट्रकखाली आल्याने अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. तर वृषाली भालेकर असे मयत महिलेचे नाव आहे. 

अपघात स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली असून तळवडे ग्रामस्थांनी या ठिकाणी रस्ता अडवला आहे. आळंदी येथे एकादशी यात्रेमुळे मोठ्या संख्येने वारकरी व नागरिक या रस्त्यावरून प्रवास करत आहेत. त्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

घटनास्थळी पोलिस यंत्रणा पोहोचलीअसून ते येथील परिस्थिती हाताळत आहेत. (Talawade)

गॅस वाहतूक करणारा ट्रक चाकणवरुन निगडीकडे जात होता. त्यावेळी तळवडे गावात जाणार्‍या दुचाकीस्वार महिलांची धडक होऊन त्या या ट्रकखाली आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.