Talegaon Dabhade : तळेगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती कडून सोमाटणे टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या तळेगाव बंदला नागरिक, भाजीपाला विक्रेते, व्यापारी व सर्व घटकांकडून तळेगाव गावभाग व स्टेशन भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. Talegaon Dabhade)सोमाटणे टोलनाका कायमचा बंद व्हावा यासाठी कृती समिती आक्रमक झाली आहे. दरम्यान कृती समितीने पुकारलेल्या शनिवार (दि.11) रोजीच्या आंदोलनाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील जोशी वाडी विठ्ठल मंदिरात बेमुदत उपोषण केले जाणार असल्याची भूमिका किशोर आवारे यांनी मांडली.

सोमाटणे टोलनाका हा अनाधिकृत असून बंद व्हावा या मागणीसाठी अनेकदा जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून सर्व पक्षीय आंदोलने करण्यात आली होती.याबाबात राज्यशासन,केंद्रशासन तसेच संबधित विविध खात्यातील प्रशासन यांना निवेदन देऊन दाद मागितली होती.परंतु याबाबत कोणत्याही गोष्टीचा राज्याने व केंद्राने विचार न करता मावळवासीय जनतेकडून अनधिकृत टोल वसूलीचा पायंडा कायम चालू ठेवला.त्याबद्दल मावळ वासीय जनतेने या प्रशासनाकडून वसूल केला जात असलेल्या या कराला विरोध करण्यासाठी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती स्थापन केली. या समितीची सर्व पक्षीय बैठक (दि. 5मार्च) रोजी संपन्न झाली. त्यावेळी त्या बैठकीमध्ये (दि.9 मार्च) रोजी तळेगाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यास अनुसरून आज सकाळ पासून तळेगाव बंदला नागरिक,भाजी विक्रेते, लहान मोठे व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, रिक्षावाले व अन्य घटकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. (Talegaon Dabhade) यामध्ये ज्या शाळांमध्ये परीक्षा चालू आहेत त्याच शाळा चालू ठेवण्यात आल्या होत्या. इतर शाळा बंद ठेवल्या होत्या. शासकीय कार्यालये, अत्यावश्यक सेवा गरजे प्रमाणे चालू होत्या.

Pune : जुन्नर तालुक्यात बिबट सफारी सुरु करणार – देवेंद्र फडणवीस

या बंदला तळेगाव परिसरातील वराळे,सोमाटणे फाटा आदी गावांनी सहभाग दर्शविला होता. तर मावळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने लेखी निवेदनाव्दारे या सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीने पुकारलेल्या बंदला पाठिंबा दर्शविला होता.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे तळेगाव स्टेशन येथे बोलताना म्हणाले  की, टोलनाका हटाव कृती समितीच्या पुकारलेल्या बंदमध्ये कृती समितीचा (Talegaon Dabhade) एकही कार्यकर्ता रस्त्यावर उतरला नाही, मात्र  नागरीक, व्यापारी आदींनी स्वयंपूर्तीने या बंदला प्रतिसाद देत बंद यशस्वी केल्याबद्दल कृती समितीच्या वतीने सर्व नागरीक, व्यापारी आदींचे आवारे यांनी आभार मानले. यावेळी सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

(दि 11) रोजी पुकारलेल्या ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने शनिवार पासून तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथील जोशीवाडी विठ्ठल मंदिरामध्ये सकाळी 11 वा. बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे आवारे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.