Pune News : अर्थसंकल्प जाहीर होताच पुण्यात शिवसैनिकांनी केला जल्लोष

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. त्यामध्ये राज्याच्या नागरिकांसाठी मोठमोठ्या घोषणा केल्या. (Pune News) त्यानंतर पुण्यातील सारसबाग समोरील शिवसेना भवना समोर शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पेढे आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा केला.

यावेळी नाना भानगिरे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार येऊन सात महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे. त्या दरम्यान अनेक विकास काम सरकारने केली असून आज राज्यातील प्रत्येक घटक डोळ्यासमोर ठेवून आजचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

त्यामध्ये पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.त्यामध्ये प्रामुख्याने भिडेवाडा उभारणे. (Pune News) स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प,रिंग रोड,नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे सुरू करणे.सारथी संस्थेचा विस्तार करणे आणि बालेवाडी येथे स्पोर्ट सायन्स सेंटरची उभारणी करणे.यासह अनेक प्रकल्पांना भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आभार व्यक्त करण्यासाठी जल्लोष साजरा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.