Talegaon Crime News : तळेगावात दोन घरफोडी मध्ये अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीला

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहरात फ्लोरासिटी आणि लेक पॅराडाईज येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरे फोडली. यामध्ये चोरट्यांनी दोन लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला (Talegaon Crime News )आहे. या घटना 20 ते 25 जानेवारी रोजीच्या कालावधीत घडल्या आहेत.

सोमसुंदरम रामसुब्रमणीयम अय्यर (वय 70, रा. फ्लोरासिटी रो हाऊस, तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri Crime News : ग्राहकांची कोट्यावधींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अय्यर यांचे आणि लेक पॅराडाईज सोसायटीत राहणारे बकुळ मुकुळ मेश्राम यांच्या घराचा कडीकोंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. दोन्ही घरातून दोन लाख 55 हजार रुपये किमतीचे साडेआठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (Talegaon Crime News ) चोरून नेले. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.