Pune News : प्रजासत्ताक दिनानिमित्त आप तर्फे पुण्यात तिरंगा रॅली

एमपीसी न्यूज – आम आदमी पार्टी पुणे शहर तर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त लोहियानगर येथे  गुरुवारी (दि.26) झेंडावंदन, संविधान वाचन आणि प्रतिष्ठित व्यक्तींचा सन्मान असे कार्यक्रम झाले. यावेळी भव्य तिरंगा रॅलीही काढण्यात (Pune News ) आली.

आप वाहतूक विंगचे राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, जेष्ठ सदस्य किशोर मुजुमदार, शहर समन्वयक अभिजित मोरे, शहर संघटक एकनाथ ढोले, आम आदमी रिक्षा संघटना अध्यक्ष आनंद अंकुश, सुजित अगरवाल, शहर मीडिया प्रमुख सुदर्शन जगदाळे, व्यापारी संघटना अध्यक्ष अनिल कोंढाळकर, किरण कद्रे, घनश्याम मारणे,  निरंजन अडागळे, अजय पैठणकर,शेखर ढगे, शत्रुघ्न कांबळे, ईश्वर कांबळे, असिफ भाई, मनोज फुलावरे, अतुल मडकर, सचिन कोतवाल, किरण कांबळे,  समीर आरवडे, फॅबियन अण्णा सॅमसन,   सुनीता काळे, वैशाली डोंगरे, प्राजक्ता देशमुख, सुरेखा भोसले, अमित मस्के, कृणाल घारे , मनोज शेट्टी , रामभाऊ इंगळे, स्वप्नील  गोरे,  तसेच कार्यक्रमाला शहरातील आप चे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते.

Talegaon Crime News : तळेगावात दोन घरफोडी मध्ये अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीला

तिरंगा रॅली (बाईक, कार, रिक्षा) ची सुरुवात फुले वाडा येथून झाली. प्रथम फुले दाम्पत्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले गेले. लक्ष्मी रोड, अलका चौक पासून परत बाजीराव रस्ता शनिवार वाडा ते पुणे पालिका इमारत येथे संपन्न झाली. पालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या सन्मानित व्यक्ती उमाकांत कांबळे (मा.उपायुक्त, समाजकल्याण), दत्तात्रय पांगारे (मा.अधिकारी राज्य कामगार विमा योजना), विक्रांत सिंग(ब्रॅड अमबॅसिटर, उत्तम वक्ता, स्वच्छता, पुणे मनपा), गिरीश पाटील(राष्ट्रीय युवा संयोजक, जलबिरादरी), एम डी जाधव(निवृत्त आर्मी आॅफिसर,  ), शशिकांत बोराटे(समाजकल्याण आयुक्तांचे सचिव), महेंद्र नामदेव रोकडे (सहाय्यक आयुक्त, मुंबई पोलीस, (निवृत्त) ), शीतल यशोधरा(सिव्हिल इंजिनियर, साहित्य क्षेत्रातील योगदान), श्वेता विनोद (लेखिका, शासन पुरस्कार सन्मानित), श्रीरंग मोहिते (28 वर्षे चळवळीत काम, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम आणि त्याच्या पुरस्काराने सन्मानित), लोहियानगर चौकी सहायक पोलीस निरीक्षक विटे आणि पालिकेतील सफाई कर्मचारी यांचा पुष्प गुच्छ आणि संविधान पुस्तक देऊन सत्कार (Pune News ) करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.