Talegaon Dabhade : तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या बारा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – पोहता येत नसताना मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या बारा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना तळेगाव स्टेशन जवळील तळ्यात शुक्रवारी (दि. 25) दुपारी साडे बाराच्या सुमारास घडली.

मलीना नवशाद शेख (वय 12, रा. झवेरी कॉलनी, तळेगाव दाभाडे) असे पाण्यात बुडून मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत विद्युत कल्लू खान ( वय 30, रा. टेल्को कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेली मुलगी आपल्या मित्रांसोबत पोहता येत नसताना देखील तळेगाव स्टेशन येथील एमएससीबी जवळील तळ्यात पोहायला गेली. पोहताना तळ्यातील पाण्यात बुडून तिचा बुडून मृत्यू झाला. याबाबत विद्युत कल्लू खान यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली.

पोलीस व लोणावळा येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. शुक्रवारी दुपारी साडे चारच्या सुमारास मलीना शेख हिचा मृतदेह तळ्यातून बाहेर काढण्यात यश आले.

शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात सोपवण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.