Talegaon Dabhade : नवीन समर्थ विद्यालय शाळेच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन 

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ऐतिहासिक, राष्ट्रीय शिक्षण ( Talegaon Dabhade) देणा-या पहिल्या नविन समर्थ विद्यालय या प्रशालेच्या नुतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले.स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य टिळक आणी गुरूवर्य अण्णासाहेब विजापुरकर यांनी देशातील पहिली राष्ट्रीय शिक्षणाची शाळा म्हणून या शाळेची स्थापना केली होती.

Hadapsar : दारूच्या नशेत दोघांनी केली गाड्यांची तोडफोड

नुतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने या शाळेच्या  नुतन इमारतीचे भूमिपूजन संस्था अध्यक्ष संजय बाळा भेगडे व सौ सारिका भेगडे यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गणेश खांडगे, खजिनदार राजेश म्हस्के, सचिव संतोष खांडगे,सहसचिव नंदकुमार शेलार,शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा, संचालक चंद्रकांत शेटे,यादवेंद्र खळदे,दामोदर शिंदे, सोनबा गोपाळे,शंकरराव नारखेडे,माजी उपनगराध्यक्ष वैशाली दाभाडे, मंगलाताई भेगडे,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य,सर्व शाळाचे मुख्याध्यापक,माजी विद्यार्थी भास्कराव म्हाळसकर,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर,अशोकराव शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

 

स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य टिळक आणी गुरूवर्य अण्णासाहेब विजापुरकर यांनी देशातील पहिली राष्ट्रीय शिक्षणाची शाळा म्हणून या शाळेची स्थापना केली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका वासंती काळोखे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते तर पर्यवेक्षक रेवाप्पा शितोळे यांनी सुत्रसंचालन केले. शालेय समितीचे अध्यक्ष महेश शहा यांनी आभार ( Talegaon Dabhade) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.