Talegaon Dabhade  : लिंब फाट्यावरील बॅरिकेट्सची दुरावस्था

एमपीसी न्यूज – लिंब फाट्यावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी ( Talegaon Dabhade) आयआरबीकडून बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.अवघ्या काही दिवसात या बॅरिकेट्सची दुरावस्था झाली आहे. बॅरिकेट्स तसेच रबलिंग स्ट्रीप लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी तळेगाव चाकण महामार्ग कृती समितीचे उपाध्यक्ष दिलीप डोळस व नगरसेवक अरुण माने यांनी केली आहे. तसेच रविवारी (दि. 17) नागरिकांच्या सुरक्षेसाठी लिंब फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणार असल्याचे डोळस यांनी सांगितले.मे.आयआरबी इन्फस्ट्रक्चर प्रा. लि.चे  व्यवस्थापक यांना दिलीप डोळस व मा नगरसेवक अरुण माने यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

Aadhar News : मोफत आधार अपडेटसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवली

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अपघात रोखले जावेत आणि वाहतूक ( Talegaon Dabhade) सुरळीत व्हावी म्हणून तळेगाव दाभाडे येथील लिंब फाटा येथे बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. मात्र या बॅरिकेट्सची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. बॅरिकेट्स काढून टाकण्यात यावेत अथवा नव्याने व्यवस्थित बसविण्यात यावेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनियंत्रित लावलेल्या रबलिंग स्ट्रीप राष्ट्रीय मानांकनानुसार दुरुस्त करण्यात याव्यात.

तसेच अनेक वाहनांना हादरे बसून अचानक वेग कमी केल्याने मागील वाहन येऊन धडकत आहेत त्यामुळे अपघात वाढले आहेत.येत्या आठ दिवसांत योग्य ती कार्यवाही आणि योग्य त्या उपाययोजना झाल्या नाहीत तर दि 17 डिसेंबर 2023  रोजी पुणे मुंबई महामार्गावर तळेगांव दाभाडे हद्दीतील लिंब फाटा येथे  नागरिकांच्या वतीने त्यांच्या सुरक्षेसा ( Talegaon Dabhade) ठी लोकशाही मार्गाने रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.तसेच होणाऱ्या परिणामाची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी असे नमूद करण्यातआले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.