Vadgaon Maval : सोमवारपासून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा गावनिहाय संवाद दौरा

एमपीसी न्यूज – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने ( Vadgaon Maval)  ‘संकल्प दूरदृष्टीचा – सर्वागीण विकासाचा’ हा दुस-या टप्प्यातील ‘गावनिहाय संवाद दौरा’ सोमवार (दि.18) आणि मंगळवार (दि.19) रोजी काढण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आंदर मावळातील 48 गावे आणि वाडीवस्त्यांवर राष्ट्रवादीने नागरिकांशी सुसंवाद साधला होता. आता दुसर्‍या टप्प्यातील दौऱ्यात नाणे मावळातील दौरा होणार असल्याची माहिती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली. नागरिकांच्या समस्या आणि कार्यकर्त्यांची सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने असलेली मते या दौऱ्यात जाणून घेतली जात आहेत.

दुस-या टप्प्यातील दौऱ्यात माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब  भेगडे,माजी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे,माजी तालुकाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे ,माजी सभापती बाबूराव वायकर, जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष  सचिन घोटकुले,माजी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, ज्येष्ठ विधीतज्ञ ॲड.नामदेवराव दाभाडे यांच्यासह मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या दौन्यात सहभागी  होणार आहे.

गणेश खांडगे म्हणाले,” राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून आणि आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘संकल्प दूरदृष्टीचा,सर्वागीण विकासाचा ‘या अभियानांतर्गत गावनिहाय संवाद दौरा आयोजित केला आहे. निमित्ताने कार्यकर्ते आणि जनतेशी सुसंवाद साधता येतो.आंदर मावळातील दौऱ्यात 46 गावात विकासावर चर्चा झाली.दोन गावात राजकीय परस्पर चर्चा झाली.

Talegaon Dabhade  : लिंब फाट्यावरील बॅरिकेट्सची दुरावस्था

आंदर मावळातील दौऱ्यातील समस्या,कार्यकर्ते व नागरिक यांची ( Vadgaon Maval)  मते या बाबतचा अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व आमदार सुनिल शेळके यांना दिला होता.या अहवालात नागरिकांनी सुचवलेल्या कामांना आणि प्रकल्पांसाठी उपमुख्यंमंत्री पवार व आमदार शेळके यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे,हे या दौ-याचे फलित आहे.

सोमवार दि 18 डिसेंबरला सकाळी 10  वाजता कांब्रे ना.मा.येथील गावभेटीत कां करंजगाव, गोवित्री, उकसान,पाले,वळवंती,वडवलीतील कार्यकर्ते व नागरिक भेटतील. दुपारी 12 वाजता भाजगाव येथे कोळवाडी,भाजगाव,शिब्रे,रदे,सोमवडी ,थोरण,जांभवली,उंबरवाडी कार्यकर्ते व नागरिक भेटतील.दुपारी 3 वाजता सागिसे येथे वडिवळे,वळक,बुधवडी, सांगिसे,वेल्हवळी,नेसावे,खांडशी, मुंढावरे येथील कार्यकर्ते व नागरिक भेटतील.

मंगळवार(दि 19) 10 वाजता ताजे येथे खामशेत,पाथरगाव,पिंपळोली,ताजे,बोरज,मुंढावरे,पाटण येथील कार्यकर्ते व नागरिक भेटतील.

दुपारी 12 वाजता कार्ला येथे टाकवे खुर्द, शिलाटणे, वेहरगाव, दहिवली, कार्ला, मळवली, वाकसई येथील कार्यकर्ते व नागरिक भेटतील.

दुपारी 3 वाजता  कुणे ना.मा.येथे वरसोली,कुणे नामा, राजमाची येथील कार्यकर्ते व नागरिक भेटतील. याच दिवशी सायंकाळी पाच वाजता कुसगाव बुद्रुक येथे कुसगाव बुद्रुक, औंढे, औढोली, भाजे, देवले, डोंगरगाव, ओळकाईवाडीतील  कार्यकर्ते व नागरिक भेटतील.

या संपूर्ण दौऱ्याच्या नियोजनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस,राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते आघाडीवर आहे.दुस-या टप्प्यातील दौ-याला मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास खांडगे ( Vadgaon Maval)  यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.