Maval : मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश जांभूळकर

26, 27, 28 जानेवारी रोजी होणार मावळ फेस्टिवल

एमपीसी न्यूज – कला, क्रीडा आणि संस्कृतीचा खजिना ( Maval) असलेला मावळ फेस्टिवल यावर्षी 26 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत होणार आहे. मावळ फेस्टिवलचे यंदा 16 वे वर्ष आहे.मावळ फेस्टिवलच्या अध्यक्षपदी सुरेश शामराव जांभूळकर यांची निवड करण्यात आली. फेस्टिवलचे संस्थापक प्रवीण चव्हाण,गुलाबराव म्हाळसकर,किरण म्हाळसकर, मावळते कार्यक्रम प्रमुख ॲड. पवन भंडारी आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड जाहीर करण्यात आली.

शुक्रवार दि.26ते रविवार दि.28 जानेवारी 2024 दरम्यान मावळ फेस्टीवल संपन्न होणार ( Maval)  असून प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वडगांव मावळ आणि परिसरातील नागरिकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व जपत तसेच रोजच्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळण्यासाठी अधिकाधिक चांगले कार्यक्रम आयोजित करण्यात येतील अशी माहिती संस्थापक प्रवीण चव्हाण यांनी दिली.

Vadgaon Maval : सोमवारपासून मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा गावनिहाय संवाद दौरा

 लहान मुले,महिला भगिनी,युवक आणि ज्येष्ठ नागरिक या आबालवृद्धांना आवडतील अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन सर्व संचालक मंडळाच्या साथीने करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष सुरेश जांभूळकर यांनी व्यक्त केला.

मावळ फेस्टीवल संस्थेचे हे 16 वे वर्ष आहे,मनोरंजन,कला क्षेत्रासह यापूर्वी कोरोना काळातील वैद्यकीय आणि अन्न धान्य वाटप उपक्रम,गो दान, विविध क्रिडा स्पर्धा,विविध क्षेत्रातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करणे,यात्रेतील लहान मोठ्या व्यावसायिकांना अन्नदान आदी अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थेच्या माध्यमातून संपन्न झाले आहेत.

याप्रसंगी विवेक धर्माधिकारी , नामदेवराव ढोरे, नितीन कुडे, अरुण वाघमारे, शैलेंद्र ढोरे, रवींद्र काकडे, शंकरराव भोंडवे, भूषण मुथा, सागर जाधव, विनायक भेगडे आदी संचालक उपस्थित ( Maval) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.