Aadhar News : मोफत आधार अपडेटसाठी तीन महिन्यांची मुदत वाढवली

एमपीसी न्यूज – आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी 14 डिसेंबर ही शेवटची (Aadhar News)  मुदत होती. आता ती तीन महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. 14 मार्च 2024 पर्यंत आधार मोफत अपडेट करता येणार आहे.

आधार कार्ड दहा वर्ष जुने असेल अथवा दहा वर्षात एकदाही आधार अपडेट केले नसेल तर अशा नागरिकांसाठी ही महत्वाची माहिती आहे. युआयडीएआयने याबाबत एक अधिसूचना प्रसारित केली आहे. मागील काही महिन्यांमध्ये आधार अपडेट करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मोफत आधार अपडेटची तारीख देखील वाढवण्यात आली आहे.

Bhosari : क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया, पुणे चॅप्टरच्या वतीने गुणवत्ता स्पर्धा 2023 संपन्न

आधार अपडेट करण्यासाठी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा ही दोन महत्वाची कागदपत्रे नागरिकांकडे असणे आवश्यक आहे. युआयडीएआयच्या वेबसाईटवर जा. त्यानंतर अपडेट आधार वर क्लिक करा. आधार क्रमांक टाकून ओटीपीद्वारे लॉग इन करा. त्यानंतर सबमिट करा. यानंतर एक विनंती क्रमांक मिळेल आणि तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल.

युआयडीएआयच्या वेबसाईटवर तुम्ही आधार अपडेटसाठी दिलेल्या विनंतीची स्थिती जाणून घेण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही दिवसांनी आधार अपडेट होईल. सहसा आधार केंद्रावर आधार अपडेट (Aadhar News)  करण्यासाठी 50 रुपये घेतले जातात. मात्र पुढील तीन महिने हा चार्ज घेतला जाणार नाही.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.