Talegaon Dabhade: डॉ.सरदेसाई तळेगाव ग्रामीण कोविड समर्पित रुग्णालयातून पहिला रुग्ण बरा

Talegaon Dabhade: First patient cures from Dr. Bhausaheb Sardesai talegaon rural covid dedicated Hospital या रूग्णालयात एकूण 23 कोवीड रूग्ण आहेत आणि सर्व रूग्णांवर योग्य ते उपचार सुरु आहेत.

तळेगाव दाभाडे- येथील मायमर वैद्यकीय महाविद्यालय संचलित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय या कोविड समर्पित रुग्णालयातून पहिला कोविड रूग्ण शनिवारी (दि 20) पूर्णपणे बरा होऊन बाहेर पडला, अशी माहिती मायमर वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा कराड- (नागरे) यांनी दिली.

या रूग्णालयात एकूण 23 कोवीड रूग्ण आहेत आणि सर्व रूग्णांवर योग्य ते उपचार सुरु आहेत. या पैकी 57 वर्षीय रुग्ण कडधे येथून या रूग्णालयात 12 जून रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आला होता.

दाखल करतेवेळी या रूग्णाला न्युमोनिया होता व श्वास घेण्यास त्रास होत हेाता. उपचारानंतर त्याची प्रकृती उत्तम असल्याने त्याला रुणालयातून सुट्टी देऊन गृह विलगीकरणासाठी पाठविण्यात आले आहे.

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयात कोविड व कोविड शिवाय इतर आजारांसाठी स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आली असून सर्व रुग्णांना उत्तम सेवा दिली जात आहे. कोविड आइसीयू सोडून मावळामधील इतर अत्यवस्थ रुग्णांसाठी स्वतंत्र आयसीयू व्यवस्था करण्यात आलेली आहे.

रूग्णाला डिस्चार्ज देताना रूग्णालयाचे कोवीड-19 कक्ष अधिकारी डॉ. सुदीप कुमार, वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत कामत आणि सर्व कर्मचारी वर्गाच्या उपस्थितीत पुष्पवर्षाव करत टाळया वाजवून रूग्णाला निरोप देण्यात आला. उत्तम आरोग्य सेवा दिल्याबद्दल रुग्णाने सर्वांचे आभार मानले.

डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रूग्णालय मावळमधील कोविड-19, नॉन कोविड रुग्णांना अविरत सेवा देण्यास कटीबद्ध असल्याचेही रूग्णालयाच्या व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.