Talegaon Dabhade : श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबरला लोकनृत्य स्पर्धा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने 14 सप्टेंबर रोजी लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गणेश मंडळाच्या सांस्कृतिक प्रमुख वैदेही अंबीकर यांनी दिली.

तळेगाव दाभाडे येथील विठ्ठल मंदिर संस्थान येथे स्व. कासाबाई भेगडे सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. या शालेय स्तरावरील स्पर्धा असून वैयक्तिक स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतात.

या स्पर्धेचे हे 32 वे वर्ष असून एकूण 12 हजार 500 रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर असून नावनोंदणीसाठी श्रीकांत मेढी – 9371105022, प्रतीक माने – 8308296564, शुभम फाटककर – 9075708025 यावर संपर्क करावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.