Talegaon : श्री गणेश तरुण मंडळ आयोजित लोकनृत्य स्पर्धा यशस्वी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने स्व. गणपतराव पंढरीनाथ शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 

या स्पर्धेमध्ये बालवाडी गटात पैसाफंड प्राथमिक शाळा (प्रथम क्रमांक), मामासाहेब खांडगे विद्यालय (द्वितीय क्रमांक), आदर्श बाल मंदिर (तृतीय क्रमांक), तर पहिली ते चौथी गट-आदर्श विद्या मंदिर (प्रथम क्रमांक), पैसाफंड प्राथमिक शाळा (द्वितीय क्रमांक), सरस्वती विद्या मंदिर (तृतीय क्रमांक), पाचवी ते सातवी गट – मामासाहेब खांडगे विद्यालय (प्रथम), नवीन समर्थ विद्यालय (द्वितीय), एप्रोज इंटरनॅशनल स्कूल (तृतीय क्रमांक) यांनी बक्षिसे मिळविली.

_MPC_DIR_MPU_II

या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय नृत्याबद्दल कांतीलाल शहा विद्यालय या शाळेला आमदार संजय भेगडे यांच्या वतीने एक हजार एक रुपये रोख आणि मानचिन्ह देण्यात आले. विजेत्यांना स्व. बबनराव गरुड यांच्या स्मरणार्थ संगीत साधना मंडळाच्या वतीने दत्तात्रय मेढी आणि संजय गरुड यांनी विजेत्यांना मानचिन्ह दिले.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून शोभा जोशी प्रणोती पंचवाघ यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत मेढी यांनी केले. शुभम फाकटकर यांनी आभार मानले. सायली बुधकर, वैदेही अंबीकर, प्रतिक माने, प्रणव लउऴकर, अनिल कुंटे, शैलेश भोसले, केदार अभ्यंकर, रोहन मराठे, अपूर्वा पिंपळखरे आदींनी संयोजन केले. यावर्षी मंडळाचे अध्यक्ष प्रतीक मेहता आणि उपाध्यक्ष म्हणून अवधूत कुलकर्णी काम बघत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.