Vadgaon Maval : अनंता कुडे,डॉ. तृप्ती शहा यांचा सामाजिक पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ मधील श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त (Vadgaon Maval) सचिव अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्कार आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉ. तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक (वैद्यकीय) पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने 46 वर्षांपासून राम जन्मोत्सव साजरा केला जात आहे.वडगाव मधील ज्येष्ठ समाजसेवक स्व. ज्ञानेश्वर तुकाराम गाडे व स्व. पार्वती शंकरराव कदम यांच्या स्मरणार्थ मागील वर्षापासून सामाजिक बांधिलकी ठेऊन सेवाभाव जपणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जात आहे.

 

यावेळी श्री पोटोबा देवस्थानचे उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, भाजपा प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर, विश्वस्त किरण भिलारे,चंद्रकांत ढोरे,अरुण चव्हाण, एड् अशोक ढमाले, तुकाराम ढोरे, सुभाष जाधव,सुनिता कुडे, मा. सभापती गुलाब म्हाळसकर,रेवतीताई वाघवले, मा. उपसभापती प्रविण चव्हाण, गंगाधर ढोरे, जितेंद्र कुडे, सनदी लेखपाल विजया आगळमे, तुकाराम गाडे,अतुल राऊत,अतिश ढोरे,श्रीनिवास कुलकर्णी,नितीन चव्हाण,प्रसाद पिंगळे,अर्चना कुडे आदीसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी हभप पांडुरंग  गायकवाड यांचे देवजन्माचे प्रवचन झाले. या कार्यक्रमाप्रसंगी श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्कार, तर डॉ तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक (वैद्यकीय) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.वडगाव मधील जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय ज्ञानेश्वर तुकाराम गाडे व स्वर्गीय श्रीमती पार्वती शंकरराव कदम यांचे स्मरणार्थ मागच्या वर्षांपासून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपून सेवाभावी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने होत आहे. त्या अनुषंगाने या वर्षी श्री पोटोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे सचिव अनंता कुडे यांच्या कार्याचा श्रीगणेशा हा श्रीगणेशोत्सव मंडळ सदस्यापासून झालेला असून सामाजिक,सांस्कृतिक,आध्यात्मिक, राजकीय आदी क्षेत्रात चांगला वावर असल्याने त्यांच्याकडून सचिवपदाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानच्या कार्याला उत्तम न्याय देता आला. त्यामुळेच त्यांनी केलेल्या पारदर्शक, निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेऊन समितीच्यावतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

डॉ, तृप्ती शशिकांत शहा यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून वैद्यकीय सेवेमध्ये कार्यरत राहून अनेक गरजू रुग्णांना अतिशय माफक दरात केलेल्या सेवाकार्यांची तसेच वडगांव मध्ये सर्वात प्रथम महिला भजनी मंडळ स्थापन करून सन्मार्ग दाखवला.  गावातील अनेक महिलांना त्या काळात विमान प्रवास घडवला आणि महिलांचे सबलीकरण करून त्यांना एकत्र व्यासपीठ निर्माण करून दिले. या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आपल्या मनोगतात संस्थेने पुरस्कार्थींची केलेली निवड,त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही सार्थ निवड केली आहे असे गौरवोद्गार काढले.

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर गाडे,सूत्रसंचालन सचिव शिवानंद कांबळे, मानपत्रवाचन भुषण मुथा व स्नेहा भंडारी यांनी केले व आभार मा. सभापती गुलाब म्हाळसकर यांनी मानले.  या कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.