Talegaon Dabhade : चांगले आरोग्य ही कार्यक्षमतेची गुरूकिल्ली – डॉ. सत्यजित वाढोकर

एमपीसी न्यूज – चांगले आरोग्य ही कार्यक्षमतेची गुरूकिल्ली आहे. व्यवस्था आणि समाज (Talegaon Dabhade) यांना जोडणाऱ्या घटकांचे त्यांच्या आरोग्याकडे लक्ष वेधण्यासाठी आरोग्यविषयक जनजागृतीचे उपक्रम महत्वाची भूमिका बजावतील, असे प्रतिपादन पवना फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ.सत्यजित वाढोकर यांनी सोमाटणे फाटो येथे केले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून माध्यम प्रतिनिधींसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराच्या समोराप प्रसंगी डॉ. वाढोकर बोलत होते.
पवना हॉस्पिटलमध्ये, 77 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ताणतणावाच्या प्रसंगाना सामोरे जाणा-या पत्रकारांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा वाढोकर,संचालिका डॉ.संजली वाढोकर, तळेगाव दाभाडे प्रेस फाउंडेशनचे अध्यक्ष अमीन खान, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघ अध्यक्ष मनोहर दाभाडे आदि उपस्थित होते. दरम्यान, गुरूवारी (ता.17) लाभार्थींच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल त्यांना सुपूर्द करण्यात आले.

पवना फाउंडेशनने सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने हाती घेतलेल्या तालुक्यातील शिक्षक,पोलीस,पत्रकार आणि स्वयंसेवी कार्यकर्त्यांसाठीच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि तातडीच्या प्रसंगी रूग्णांसाठी विनाशुल्क प्रथमोपचार प्रशिक्षण उपक्रमांची माहिती फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा वाढोकर यांनी यावेळी दिली.
शिबिरात तालुक्यातील 49 माध्यम प्रतिनिधींनी सहभाग घेतला. यावेळी डॉ.वर्षा, डॉ. सत्यजीत आणि डॉ.  संजली यांच्या हस्ते लाभार्थींना मोफत हेल्थ कार्डचे वितरण करण्यात आले. पवना फाउंडेशनने हाती घेतलेल्या जीवरक्षक आणि अपघातातील गंभीर जखमींचे प्राण वाचविण्यासाठीच्या उपक्रमाची माहिती डॉ.वर्षा वाढोकर यांनी दिली.
यावेळी अमीन खान, मनोहर दाभाडे यांचीही भाषणे झाली. वैद्यकीय संचालक डॉ.अतुल अदानिया यांनी प्रास्ताविक केले. शिबिराचे संयोजन सरव्यवस्थापिका फरीदा बेग आणि सहका-यांनी केले. शिबिरात विविध प्रकारच्या तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देण्यात आल्याची माहिती (Talegaon Dabhade) त्यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.