Talegaon Dabhade : आरोग्य तपासणी शिबिरात 100 पेक्षा अधिक पोलीस, कुटुंबियांचा सहभाग

एमपीसी न्यूज – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, (Talegaon Dabhade) ओन्को लाइफ कॅन्सर हॉस्पिटल तळेगाव दाभाडे, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, महिला दक्षता समिती, ग्राम सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी व त्यांच्या परिवारासाठी मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आले. यामध्ये 100 पेक्षा अधिक पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेत आरोग्य तपासणी केली.

यावेळी सत्यवान माने,वनिता धुमाळ, ओंको लाईफचे उदयसिंह देशमुख, संगीता तिवारी, तळेगाव एम आय डी सीचे पोलीस निरीक्षक रणजित सावंत, तळेगाव पोलीस स्टेशनचे प्रशांत वाबळे, बाबा मुंडे,इतर पोलीस अधिकारी,रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे चे अध्यक्ष उद्धव चितळे, प्रकल्प प्रमुख डॉ नेहा कुलकर्णी, उपाध्यक्ष कमलेश कारले,सचिव श्रीशैल मेन्थे, मेडिकल डायरेक्टर डॉ ज्योती मुंडर्गी, पोलीस दक्षता समितीच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे तसेच सर्वच संस्थेचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Talegaon Dabhade : रोटरी सिटीच्या वतीने सोमाटणे येथे फळझाडांची लागवड

रोटरी क्लब ऑफ तळेगांव दाभाडे,ओन्को लाइफ कॅन्सर हॉस्पिटल तळेगांव दाभाडे, तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशन, महिला दक्षता समिती,ग्राम सुरक्षा दल यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस कर्मचारी व त्यांच्या परिवारासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर सुशिला मंगल कार्यालय येथे (दि 18ऑगस्ट) सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले होते.

त्यामध्ये 1) हिमोग्राम, 2) रक्तातील साखर,3) स्त्री व पुरुषांसाठी कर्करोग तपासणी,4 ) प्रतिबंधक उपाय व मार्गदर्शन डॉ श्रीवास्तव यांनी केले.

 ग्युफीक फार्मा तर्फे हाडांची घनता तपासणी  व आयुर्वेदिक औषधे मोफत देण्यात येतील.

देहूरोड, तळेगाव दाभाडे, शिरगाव, तळेगाव एम आय डी सी अंतर्गत येणाऱ्या 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी व कुटुंबीयांनी या शिबिराचा लाभ घेतला.रक्त तपासणी,हृदय रोग तपासणी,हाडांची तपासणी,प्याप स्मीअर तपासणी,कर्क रोग तपासणी तसेच औषध उपचार करण्यात (Talegaon Dabhade) आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.