Talegaon Dabhade : आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या (Talegaon Dabhade) जयंती निमित्त विरांगना महिला विकास संस्थेच्या संस्थापिका नीलिमा संतोष दाभाडे पाटील यांच्या मार्गदर्शनातून सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून भव्य आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. शुक्रवारी (दि.10) चावडी चौक मंडळ सभागृह येथे पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

शिबिराप्रसंगी विद्यमान नगरसेविका  मंगल जाधव, रजनी ठाकूर, निलिमा दाभाडे, नेहा गराडे,सुजाता मलघे, शैलजा काळोखे, शीतल काकडे, अल्पना हुंडारे, लता दाभाडे, ज्योती दाभाडे, नंदा दाभाडे ह्यांनी आरोग्य तपासणी विषयी मार्गदर्शन केले.

Hinjawadi News : दारूच्या नशेत पत्नीचा भर रस्त्यात खून, पतीला अटक

ह्या शिबिराच्या सर्व टेस्ट तपासणीसाठी सौरभ चिंचवडे जनसेवा डायग्नोस्टिक संस्थापक तसेच आशा संदीप ढाकोळ / आंबेकर, सागर वाघमोडे ह्यांनी विशेष प्रयत्न केले.बहुसंख्य महिलांनी ह्या शिबिराचा लाभ घेऊन आपले आरोग्य कसे सांभाळता येईल, हे जाणून घेतले.

शिबिराचे प्रास्ताविक अध्यक्षा वीणा दाभाडे व आभार चारुशीला काटे यांनी मागितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.