Pimpri News : दरोड्याच्या गुन्ह्यातील वीस वर्षांपासून फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज – मागील वीस वर्षांपासून दरोड्याच्या गुन्ह्यात (Pimpri News) फरार असलेल्या आरोपीला पकडण्यात गुन्हे शाखा युनिट दोनला यश आले आहे. पिंपरी मध्ये गुन्हा करून नाव व वास्तव्य लपवून हा आरोपी पुणे शहरातील कोंढवा परिसरात राहत होता.

फजल उर्फ फैजूर रेहमान शौकतअली शेख (वय 37, रा. खराळवाडी, पिंपरी. सध्या रा. कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2003 मध्ये आरोपी फजल याने पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा घातला होता. दरोड्याचा गुन्हा करून फजल पळून गेला. तो अस्तित्व व ओळख लपवून, नाव बदलून फिरत असल्याने पोलिसांना तो सापडला नाही. दरम्यान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी फरार आरोपींना शोधण्यासाठी विशेष मोहीम आरंभली.

Talegaon Dabhade : आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

त्यामध्ये गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या पथकाला फजलबाबत माहिती मिळाली. फजल हा

सध्या कोंढवा येथे राहत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कोंढवा येथे सापळा लावला. वीस वर्षानंतर देखील फजलच्या मनात पोलिसांविषयी भीती होती. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून जाऊ लागला.

त्याचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वीस वर्षांपूर्वी दरोड्याचा गुन्हा केल्याचे कबूल केले. पुढील कारवाईसाठी त्याला पिंपरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.