Ravet News : रावेत येथे बांधकाम मजुरांच्या मुलांनी अनुभवली मस्ती की पाठशाला

एमपीसी न्यूज – मुले ही देवा घरची फुले असतात….मात्र प्रत्येक फुलाला अन मुलाला आनंद, सुख मिळेलच अस नाही. बांधकाम मजुरांच्या मुलांनाही आई-वडिलांमागे कष्ट अन अशिक्षीतपणा वारसा म्हणूनच मिळतो. हे समिकरण कुठे तरी थांबावे म्हणून  बांधकाम मजुरांच्या मुलांसाठी सहगामी फाऊंडेशनच्या (Ravet News) तर्फे मस्के वस्तीरावेत येथे मस्ती की पाठशाळा चालविली जाते.

 

वस्तीतील मजुरांच्या मुलांना शिकवून त्यांना जवळपासच्या सरकारी शाळेत अॅडमिशन मिळवून देणे हे काम या संस्थेद्वारे करण्यात येते. परतु शिक्षणासोबत मुलांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी संस्थेद्वारे अनेक उपक्रम राबविले जातात. जसे की कथक नृत्य कलायोग प्रशिक्षण वर्गशिवण कला इत्यादीद्वारे मुलांचा सर्वागिण विविक करण्यात येत आहे. म्हणजे असे विविध कोर्सेस करून काही मुले मुली शिक्षणासोबत स्वत:च्या पायावर उभं राहू शकतील. हे स्किल डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देता यावे यासाठी एखाद्या हॉलची गरज होती.

 

Pimpri News : दरोड्याच्या गुन्ह्यातील वीस वर्षांपासून फरार आरोपीला अटक

 

रेलफोर फाऊंडेशनचे सीएसआर मॅनेजर नितीन घोडके यांच्या प्रयत्नातून सहगामी फाऊंडेशन मस्ती की पाठशाळेत प्रशस्त असा कम्युनिटी हाॅल नुकताच बांधून देण्यात आला आहे. या हाॅलच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून रेलफोर फाऊंडेशनच्या डायरेक्टर टीना नाथानी व सीएसआर मॅनेजर नितीन घोडके हे उपस्थित होते.

तसेच डोनेट एड सोसायटीच्या किशोरी अग्निहोत्री उपस्थित होत्या. सीएसआर व्यवस्थापक नितन घोडके म्हणाले की, समाजातील गरंजूपर्यंत पोहोचून त्यांना शक्य ती मदत करणे हे काम रेलफोर फाऊंडेशन सीएसआरच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे करत आहे. याच विचाराने आज आम्ही सहगामी फाऊंडेशनला मस्ती की पाठशाळेसाठी कम्युनिटी हाॅल व ट्रेनिंग सेंटर उभारून दिले आहे.

 

 

तर सहगामी फाऊंडेशनच्या अध्यक्ष प्राजक्ता रुद्रवार म्हणाल्या की, बांधकाम मजुराचा परिवार हा तसा समाजातील वंचित घटक आहे म्हणता येईल. कामासाठी सतत जागा बदलत जावे लागत असल्यामुळे ही लोक शिक्षण प्रवाहापासून दूर असतात. त्यांना किमान कौशल्य विकास ट्रेनिंग देऊन स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने हे ट्रेनिंग सेटर कामी येणार आहे. गाव बदलले तर महिला व मोठ्या मुली पोटपाण्यासाठी स्वव्यवसायातून (Ravet News) पैसे कमावू शकतील.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.