Pimpri News : ‘समर्पण प्रतिष्ठानच्या ‘तारांगण’ कार्यक्रमात 4 लाख रुपयांचा निधी हस्तांतरित

एमपीसी न्यूज – पीडित, अत्याचारित आणि निराधार मुली व महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करत असलेल्या अमरावती येथील ‘समर्पण संस्थे’ला मदतीचा हात देण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड मधील ‘शिवांजली हेल्पिंग हॅंड्स’ ग्रुपच्या वतीने शनिवारी (दि.11) प्राधिकरणच्या ‘वीर सावरकर सभागृहात’ ‘तारांगण 2023’ या (Pimpri News) कार्यक्रमात लोकसहभागातून संकलित केलेला चार लक्ष रुपयांचा निधी एचआयव्ही बाधित व दिव्यांग मुलींच्या प्रकल्पाच्या बांधकामासाठी हस्तांतरित करण्यात आला. ‘समर्पण’चे संस्थापक अमोल मानकर यांनी तो स्वीकारला.

यावेळी सेवा ‘संकल्प प्रतिष्ठान’ चे नंदकूमार पालवे,  ‘पालकपहाट’च्या देवयानी गोविंदवार, वाल्हेकरवाडी रोटरी क्लबचे संस्थापक प्रदीप वाल्हेकर, आपण फौंडेशनचे मनोज गोविंदवार, सामाजिक कार्यकर्त्या आरती पालवे, पालवी संस्थेच्या डिंपल घाडगे आदि उपस्थित होते.

मुली व भगिनींसह लहान बालके, वयोवृद्ध व्यक्तींच्या सुरक्षित व आनंदी जीवनसाठी समर्पण प्रतिष्ठान ‘सांझाराम’ हे छोटेसे गांव वसवत आहे. या ठिकाणी एचआयव्ही बाधित आणि दिव्याग मुलींच्या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी  ‘शिवांजली हेल्पिंग हॅंड्स’ ग्रुपने पुण्यातील संवेदनशील लोकांना मदतीचे आवाहन करून 4 लाख रुपयांचा निधी उभारला होता.

 

Ravet News : रावेत येथे बांधकाम मजुरांच्या मुलांनी अनुभवली मस्ती की पाठशाला

 

‘तारांगण 2023’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने तो अमोल मानकर यांच्याकडे मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. 2023-24 या आर्थिक वर्षात समर्पण प्रतिष्ठानच्या प्रकल्पासाठी एक कोटी रुपयांचा निधी  संकलित करण्याचा संकल्प केला. सेवा संकल्प प्रतिष्ठानचे संचालक नंदकुमार पालवे यांनी स्वानुभवातून सामाजिक कार्याचे महत्व आणि समर्पण प्रतिष्ठान सारख्या संस्थांची समाजातील गरज याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. ‘आपण फाऊंडेशन’चे मनोज गोविंदवार यांनी “दुसऱ्यांचे दु:ख कमी केल्याने आपले स्वतचे दु:ख कमी होते, आनंदी जीवनाचे (Pimpri News)हेच सूत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

“पालकपहाट”च्या देवयानी गोविंदवार यांनी उपस्थित पालकांशी मनमोकळा संवाद साधत समाजातील सर्व प्रश्न पालकत्वातून निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले. रोटरी क्लब वाल्हकरवाडीचे प्रदीप वाल्हेकर यांनी पवना नदीचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. तसेच सपर्पण प्रतिष्ठानच्या कार्यात सहभागी होत असल्याची ग्वाही दिली. ‘ओरगॅनो  मार्ट’ च्या वसुंधरा मुठाळ यांनी त्यांच्या कंपनीच्या प्रत्येक उत्पादनांच्या विक्रीतून प्राप्त होणा-या नफ्यातील ठराविक रक्कम समर्पण प्रतिष्ठान ला मदत म्हणून देण्याचे जाहीर केले.

बाबासाहेब काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सागर मिसाळ यांनी आभार व्यक्त केले. तर शिवांजली हेलपिंग हॅंड्स’चे कानिफ गौरी, सुरज यांनी निधी संकलन आणि ‘तारांगण’ च्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.