Hinjawadi Crime News : महिलेचे अश्लील व्हिडीओ मैत्रिणीला पाठवणाऱ्या दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेचे अश्लील व्हिडीओ बनवून ते मैत्रिणीला पाठवणाऱ्या ( Hinjawadi Crime News ) तरुणासह त्याच्या मैत्रिणी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि.10) सायंकाळी मारुंजी रोड, हिंजवडी येथील एका हॉस्पिटलमध्ये घडली.

आकाश लवानीया (रा. मारुंजी रोड, हिंजवडी) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

Pimpri News : ‘समर्पण प्रतिष्ठानच्या ‘तारांगण’ कार्यक्रमात 4 लाख रुपयांचा निधी हस्तांतरित

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्या त्यांच्या रूमच्या बाथरूममध्ये अंघोळ करत असताना आकाश याने लपून व्हिडीओ काढला. तो व्हिडीओ त्याने त्याच्या प्रेयसीला पाठवत ( Hinjawadi Crime News ) फिर्यादीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.