Pune : नानापेठ येथे आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – नाना पेठमधील नवरत्न मित्र मंडळाच्या वतीने एम. ए. रंगूनवाला डेनरीस कॉलेज व युनायटेड डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन शिवसेना सहसंपर्क प्रमुख अजय भोसले व पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड श्रीकांत अगस्ते यांच्या हस्ते करण्यात आले.

शिबिरात मोफत दंतचिकित्सा, रक्त तपासणी, मधुमेह तपासणी करण्यात आली. तसेच अल्पदरात नागरिकांसाठी पॅनकार्ड काढून देण्यात आले.
या शिबिरासाठी शिवराज मंडळ, यंग भोर्डे आळी मित्र मंडळ, खिलाडी मित्र मंडळ व निता नायकू स्मृती प्रतिष्ठान आदी सामाजिक संस्थांनी विशेष सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.