Pune : शिवराम तरुण मंडळ आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 50 पिशव्या रक्त संकलित

एमपीसी न्यूज – पुणे लष्कर भागातील सैफी लेनमधील यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणारे श्री शिवराम तरुण मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते . या रक्तदान शिबिराचे उदघाटन रक्ताचे नातें ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड व जेष्ठ विधीज्ञ ऍड राहील मलिक यांच्याहस्ते करण्यात आले.  यावेळी ५० पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या.

रक्तदात्यांना श्री शिवराम तरुण मंडळातर्फे पत्र , ससून रक्तपेढीतर्फे पत्र व अल्पोपहार देण्यात आला. यावेळी श्री शिवराम तरुण मंडळ सुवर्णमहोत्सवी वर्ष अध्यक्ष असिफ  हारुण शेख ,रमेश विचारे ,सुरेश रासगे , इंद्रजित सकट , काशिनाथ गायकवाड , रहीम सय्यद , राजू रणदिवे , सतीश लांडगे , जितेंद्र जठार , रमेश परदेशी , राजेश गाडे , रॉजर फर्नाडिस , निलेश शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र जगताप यांनी केले . शिबिराच्या आयोजनासाठी तेजस जाधव , शाम वैराट , रशीद सय्यद , नूर शेख , डॉ कविता रासगे , अंजली फर्नाडिस , सॅन्ड्रा फर्नाडिस आदींनी विशेष परिश्रम घेतले . ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुदेशमा गजभिये , समाजसेवा अधीक्षक अरुण बर्डे , डॉ श्रध्दा रासगे , डॉ प्रिया त्रिपाठी , डॉ सौरभ कुसूरकर , एकता केंजळे ,रुपाली निंबेकर , मनीषा दिघे , डॉ धीरज पाटील , कालिदास वाघेला आदीनी विशेष सहकार्य केले .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.