Talegaon Dabhade : रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेकडून विविध मान्यवरांचा सन्मान

एमपीसी न्यूज – धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेने रौप्य महोत्सवी ( Talegaon Dabhade) वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेतले. त्यामध्ये पतसंस्थेकडून विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. निलेश गराडे यांना कर्तव्यनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच 25 वर्षांपासून पतसंस्थेत बचत करणारे शैलेश वहिले, प्रवीण जगदाळे तसेच इंग्लंडमध्ये डॉक्टर पदवी घेणाऱ्या आर्या बोत्रे यांचा सन्मान करण्यात आला.

यामध्ये सभासद मेळावा,पतसंस्थेचे सचिव संजय शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मावळातील सर्वांसाठी भव्य लकी ड्रॉ व खेळ पैठणीचा ठेवण्यात आला होता.यावेळी 1200 हुनअधिक महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला.

Vadgaon Maval : खरेदी विक्री संघाची निवडणूक महायुती एकत्रित लढणार

याप्रसंगी गणेश भेगडे,रवींद्र दाभाडे, सत्येन्द्रराजे दाभाडे,विलास काळोखे, बिजेंद्र किल्लावाला,सारिका शेळके, सायली बोत्रे,अमृता टकले (पंडित), सत्यशीलराजे दाभाडे, उषा संजोग वाघेरे,अरुण माने,सतिश गरुड, संस्थापक खंडू टकले,अध्यक्ष विनोद टकले,उपाध्यक्ष जितेंद्र बोत्रे,सचिव संजय शिंदे,खजिनदार सुधीर खांबेटे तसेच संचालक विजय शेटे,दत्तात्रय शिंदे,दत्तात्रय पिंजण,संतोष परदेशी, अमर खळदे,कैलास चव्हाण,केशव कुल,किरण किल्लावाला,कल्पना चव्हाण,सुरेखा डेनकर,निलेश पारगे, संकेत खळदे, दत्तात्रय साळुंके,मयूर वाघोले आदी उपस्थित होते.

स्वागत आदित्य टकले, प्रास्ताविक संजय शिंदे व उपस्थितांना मार्गदर्शन विनोद टकले यांनी केले.सुत्रसंचालन शितल विजय शेटे यांनी केले. आभार मयुर पिंगळे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापिका सुनिता शेंडे, कर्मचारी वर्ग  व  दै.बचत प्रतिनिधी ( Talegaon Dabhade)  यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.