Talegaon-Dabhade : संपर्क प्रकल्पातील विद्यार्थ्यांसाठी इनरव्हील क्लब कडून अन्नधान्य वाटप

एमपीसी न्यूज : मुळशी तालुक्यातील भांबर्डे येथील संपर्क प्रकल्पातील विद्यार्थ्यांसाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.(Talegaon Dabhade) यामध्ये दररोज लागणारे अन्नधान्य क्लब कडून संस्थेला देण्यात आले.संस्थेतील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा इनर व्हील क्लब कडून पुढील वर्षीपासून सत्कार केला जाणार असल्याचे क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी यावेळी जाहीर केले.

सोमवार (दि 23)  रोजी संपर्क भांबर्डे (ता. मुळशी) प्रकल्पामध्ये इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे येथील अध्यक्षा वैशाली दाभाडे तसेच इनरव्हीलचे इतर सदस्य यांच्या वतीने अन्नधान्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाळून सर यांनी केले. इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे,(Talegaon-Dabhade) निशा पवार, ममता मराठे, भाग्यश्री काळेबाग, मंगल पवार, सुजाता खंडागळे, या सर्वांचे स्वागत व सत्कार श्रीफळ देऊन नवनिता चटर्जी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी वैशाली दाभाडे यांनी मुलांना दिव्याचे महत्त्व तसेच अभ्यासाचे महत्त्व आणि विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन चांगले गुण मिळवण्यासाठी इयत्ता दहावी व बारावी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना व 80% च्या वर गुण मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पुढील वर्षी निकालानंतर घेतला जाईल असे घोषित केले.

Organ Donation: चार मेंदू मृत (ब्रेन डेड) रुग्णांच्या अवयवदानातून 15 रुग्णांना मिळाले नवजीवन

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने याप्रसंगी 1) तांदूळ 50 kg 2)साखर 50 kg 3) तुरदाळ 10 Kg 4) गहू 60 Kg 5) पाच लिटर तेल 6) चहा पत्ती 8 kg 7) डिटर्जंट सोप बॉक्स 1 इत्यादी साहित्य वस्तीगृहाचे अध्यक्ष धावडे सर वस्तीगृहातील विद्यार्थी यांना वितरण करण्यात आले.

या वाटपासाठी सुजाता खंडागळे,मंगल पवार,ममता मराठे,प्रवीण साठे,सुनीता काळोखे,उज्वला बागवे,माया भेगडे, हेमलता खळदे, सुनीता अगरवाल,सीमा खळदे ,पल्लवी सरनाईक यांचे योगदान लाभले. याप्रसंगी. सतीश माळी सर कोऑर्डिनेटर संपर्क संस्था ही उपस्थित होते.(Talegaon-Dabhade)कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पठाण सर यांनी केले तर आभार प्रदर्शन  खरात सर यांनी केले त्याचप्रमाणे जेवण व्यवस्था साफसफाई फलक लेखन किचन डिपारमेंट या सर्वांनी नियोजनाप्रमाणे उत्तम काम करून कार्यक्रम यशस्वी करण्यात खारीचा वाटा उचलला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.