Organ Donation: चार मेंदू मृत (ब्रेन डेड) रुग्णांच्या अवयवदानातून 15 रुग्णांना मिळाले नवजीवन

एमपीसी न्यूज: नुकतेच डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय,(Organ Donation) रुग्णालय व संशोधन केंद्र येथे 4 मेंदू मृत (ब्रेन डेड) रुग्णांच्या अवयवदानातून व नातेवाईकांच्या धाडसी निर्णयामुळे एकूण 15 रुग्णांना नवजीवन मिळाले. यामध्ये दात्यांच्या अवयवदानातून 1 हृदयसह फुप्फुस,  1 हृदय, 1 फुप्फुस, 4 यकृत, 4 मूत्रपिंड, 4 नेत्रपटल अश्या 15 अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले.  

पहिले अवयवदान – 21 वर्षीय युवतीला मेंदूमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे मेंदू मृत घोषित करण्यात आले तिच्या अवयव दानातून एक यकृत पुण्यातील खाजगी रुग्णालय प्रत्यारोपीत करण्यात आले.

दुसरे अवयव दान – 26 वर्षीय युवतीला ब्रेन हॅमरेज होऊन तीला मेंदू मृत घोषित करण्यात आले तिच्या अवयव दानातून 1 हृदयसह फुप्फुस (दुहेरी प्रत्यारोपण) 37 वर्षीय महिलेला, यकृत 65 वर्षीय पुरुष,  एक मूत्रपिंड 17 वर्षीय तरुणाला डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल मध्ये या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले.(Blood Donation) दुसऱ्या मूत्रपिंडाचे प्रत्यारोपण  पुण्यातील खाजगी हॉस्पिटल मध्ये करण्यात आले.प्रतीक्षा यादी नुसार दोन नेत्रपटल गरजू रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात येतील.

Lonavala News: लोणावळ्यातील होम स्टे असोसिएशनच्या मागणीला यश; सहाय्यक निबंधकाचे ते पत्र रद्द

तिसरे अवयव दान – दि 23 ऑगस्ट रोजी – 68 वर्षीय या पुरुषाला मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदू मृत घोषित करण्यात आले त्यांचे यकृतातून गरजू रुग्णाला पुण्यातील खाजगी रुग्णालय प्रत्यारोपीत करण्यात आले.

चौथे अवयव दान – दि 24 ऑगस्ट रोजी एका 24 वर्षीय युवकाच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदू मृत घोषित करण्यात आले. युवक चिखली येथील रहिवासी असून तो रिक्षा चालक होता. त्यांच्या आई वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.(Blood Donation) दात्याच्या अवयवदानतून एक हृदय हे सुरत गुजरात येथील रुग्णालयातील 35 वर्षीय पुरुषास प्रत्यारोपित करण्यात आले आणि एक फुप्फुस  हैदराबाद येथील रुग्णालयातील 60 वर्षीय पुरुष रुग्णाला प्रत्यारोपित करण्यात आले तर यकृत 65वर्षीय महिला व मूत्रपिंड 33 वर्षीय पुरुषास डॉ डी वाय पाटील रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले. दूसरे मूत्रपिंड पुण्यातील शासकीय रुग्णालयात प्रत्यारोपीत करण्यात आले. प्रतीक्षा यादी नुसार दोन नेत्रपटल गरजू रुग्णांना प्रत्यारोपित करण्यात येतील.

मानवी प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदीनुसार या मेंदू मृत रुग्णाच्या कुटुंबियांना अवयवदानाविषयी अवयवदान व प्रत्यारोपण विभागाच्या समन्वयक यांनी समुपदेशन केले व त्यांच्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र यांच्या प्रतीक्षा यादी प्रमाणे या अवयवाचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे.

 

अवयवदात्याच्या नातेवाईकांचा निर्णय तसेच रुग्णालयातील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या वेगवान कृतीमुळे या 15 रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत झाली.(Organ Donation) रुग्णांना नवसंजीवनी देण्याची किमया डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्या डॉक्टरांनी साधली. रस्ते मार्ग, वायू मार्ग या ग्रीन कॉरिडॉरद्वारे पिंपरी येथून विविध रुग्णालया पर्यंत अवयव पोहोवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच Ztcc पुणे विभागातील सदस्याचे सहकार्य लाभले.

“कुटुंबावरील असाह्य दुःखाचा आघात बाजूला सारून ब्रेन डेड तरुणीच्या नातेवाईकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णयामुळे 15 रुग्णांना नवजीवन मिळाले आहे.(Organ Donation) अवयवदानाबाबत या चार कुटुंबीयांनी समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या दुःखात आम्ही ही सहभागी आहोत” अशी भावना प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांनी व्यक्त केली.

“प्रामुख्याने हृदय व  फुप्फुस प्रत्यारोपण करणे व इतर अवयवाचे प्रत्यारोपण व अवयवदान प्रक्रियेमध्ये आमच्या डॉक्टरांसमोर फार मोठे आव्हान होते.(Organ Donation)उपलब्ध जागतिक दर्जाची सेवा सुविधांमुळे व आमच्या तज्ञ डॉक्टरांमुळे हे शक्य झाले आहे. आमच्या डॉक्टरांवर सोपवलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेली याचा आम्हाला अभिमान वाटतो. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेमुळे आमच्या रुग्णालयाचे नावलौकिक वाढले आहे”. असे मत कुलपती डॉ पी डी पाटील यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले ztcc पुणे विभागातील हृदया बरोबर फुप्फुसाचे  (दुहेरी प्रत्यारोपण)  हे पहिलेच प्रत्यारोपण आहे.

डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, विश्वस्त व कोषाध्यक्ष डॉ.यशराज पाटील यांनी अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेतील सर्वांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.