Talegaon Dabhade : आंबीच्या उपसरपंचपदी जयश्री घोजगे बिनविरोध

एमपीसी न्यूज- मावळ येथील आंबी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री संभाजी घोजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र घोजगे यांनी आपल्या पदाचा कार्यकाल संपल्याने राजीनामा दिला होता.

रिक्त झालेल्या जागेवर सरपंच बायडाबाई गराडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडणुकीत जयश्री घोजगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे बालाजी यांनी उपसरपंचपदी जयश्री घोजगे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य वामनराव वारींगे, रवींद्र घोजगे, किसन शिंदे, सुवर्णा नखाते, नंदाताई घोजगे, बाबासाहेब घोजगे, सोनाली बनसोडे व पोलीस पाटील भानुदास दरेकर, योगेश घोजगे, तळेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, नगरसेवक संदीप शेळके, माजी सरपंच भरत घोजगे, भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष पिराजी वारींगे सर, समीर जाधव, प्रताप आंभोरे, संभाजी पवार आदीं मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते घोजगे यांचा शाल,श्रीफळ, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. निवडी नंतर मिरवणूक काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.