Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वराळे येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- वराळे येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उदघाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) करण्यात आले यावेळी आमदार सुनील शेळके यांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले की विकास कामे हाती घेऊन ती पूर्ण झाल्यावरच त्यांचा नारळ वाढवायचा. वराळे ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतने सहकार्य केल्यास येत्या काळात कचरा प्रकल्प व सांडपाण्याची समस्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करीन व येत्या काळात 1 कोटी रुपयाचा निधी गावच्या विकास कामांसाठी मंजूर करुन देण्याचे आश्वासन शेळके यांनी दिले.

यावेळी तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व नगरसेवक गणेश काकडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष खांडगे, माजी सरपंच मनोहर मराठे, तळेगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ मराठे, माजी उपसरपंच रामचंद्र मराठे, निलेश मराठे, संतोष मराठे, कल्पेश मराठे, आशाताई भवार, नवनिर्वाचित उपसरपंच प्रियंका रामदास भेगडे, सदस्या सारिका रामदास मांडेकर, मनीषा राम मराठे, अस्मिता निलेश मराठे, रुपाली राजाभाऊ आढळे, सीमा विकास मराठे, लिलाबाई वाजे, विकास पवार, निलेश दत्तू मराठे, गणेश मच्छिंद्र मराठे तसेच ग्रामस्थ व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक रामभाऊ मराठे पाटील यांनी केले व आभार रामदास मांडेकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.