Talegaon Dabhade News : माळवाडी गावात कर वसुलीसाठी अभियान

एमपीसी न्यूज – माळवाडी ग्रामस्थांनी वेळेत ग्रामपंचायत कर, पाणीपट्टी, घरपट्टी, आरोग्यकर भरण्यासाठी जनजागृती म्हणून मंगळवारी (दि. 21) माळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने गावात कर वसुलीसाठी अभियान राबविण्यात आले.

ग्रामपंचायतीचा कर भरल्यास ग्रामपंचायतीमार्फत अनेक शासकीय योजना व सुविधा गावासाठी पुरवल्या जातील असे आश्वासन यावेळी ग्रामपंचायतीकडून सरपंच पुनम अल्हाट व उपसरपंच, सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुनील नाना भोंगाडे व सदस्य यांच्याकडून ग्रामस्थांना देण्यात आले.

ग्रामस्थांनी वेळेत ग्रामपंचायत कर, पाणीपट्टी, घरपट्टी, आरोग्यकर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे व गावाचा विकास करावा तसेच शासकीय योजनांचा लाभ घ्यावा यासाठी जनजागृती म्हणून आज माळवाडी ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावात कर वसुलीसाठी अभियान राबविण्यात आले.

यासाठी प्रामुख्याने माळवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामस्थ देखील सहभागी होऊन कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता पाऊस पाण्याचा विचार न करता संपूर्ण गावांमध्ये फिरून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यात आली.

ग्रामपंचायतीला कर भरून सहकार्य केले तर ग्रामपंचायतीमार्फत अनेक शासकीय योजना सुविधा गावासाठी पुरवल्या जातील असे वचन ही ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आले.

मावळ तालुक्याचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाने व सहकार्याने ग्रामपंचायतीला चांगले सहकार्य होत आहे. त्याचादेखील ग्रामस्थांनी उपयोग करून घ्यावा ही विनंती देखील करण्यात आली.

या अभियानासाठी सरपंच पुनम अल्लाट उपसरपंच सुनील नाना भोंगाडे, सदस्य दीपक दाभाडे, मनिषा दाभाडे, पल्लवी दाभाडे, पल्लवी मराठे, सुधीर आल्हाट, सचिन शेळके, रेश्मा दाभाडे, ग्रामस्थ दिलीप दाभाडे, मयूर दाभाडे,पप्पू माळी, किशोर दाभाडे रोहिदास मराठे, ग्रामसेवक खेसे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीने हातात सूचनाफलक घेऊन व रेकॉर्डिंग गाडी फिरून ग्रामपंचायतकर भरण्यासाठी ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.