Pimpri Corona Update: लसीकरणाचा 18 लाखाचा टप्पा पूर्ण, शहरात आज 107 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 107 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 83 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 18 लाखाचा टप्पा पूर्ण झाला.

शहरातील 2 आणि महापालिका हद्दीबाहेरील 1 अशा 3 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 422 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 72 हजार 796 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 1 हजार 106 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 708 रुग्ण गृहविलगीकरणात असून 398 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 49 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 436 आहेत. आज दिवसभरात 24 हजार 338 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 18 लाख 1 हजार 553 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.