Talegaon Dabhade News : तळेगाव दाभाडे येथून सुमारे तीन लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील (Talegaon Dabhade News ) कारावाईत पोलिसांनी 2 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त करत दोघांना अटक केली आहे. ही कारवाई कडोलकर कॉलनी येथे शनिवारी (दि.25) खंडणी विरोधी पथकाने केली आहे.

 

निहार गोपाल विश्वास (वय 51 रा.तळेगाव दाभाडे) व त्याचा कामगार अविजीत रणजीत बाच्छार (वय 26 रा.तळेगाव दाभाडे) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

 

Pune News : पुणे विभागातील हजारो शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक तळेगाव दाभाडे येथे गस्त घालत असताना त्यांना खबर मिळाली की, राखाडी रंगाची इको गाडी (एमएच 14 ईवाय 3668) ही गाडी कडोलकर कॉलनी येथे रात्री उशीरा येवून गुटख्याची विक्री कऱणार आहे.या खात्रीशीर बातमीच्या अधारे पथकाचे कडोलकर कॉलनीत लायन्स क्लब जवळ सापळा रचला.

 

यावेळी संबंधीत क्रमांकाची गाडी येताच त्यातून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या गाडीची झडती घेतली असता 2 लाख 94 हजार 554 रुपयांचा गुटका, पान मसाला तसेच दोन मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली इको गाडी असा एकूण 7 लाख 54 हजार 554 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

हि कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहायक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक दुधावणे, पोलीस अंमलदार प्रदिप गोडांबे, आशिष बोटके, सुधीर डोळस (Talegaon Dabhade News ) यांनी केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.