Talegaon Dabhade : तळेगाव येथे मोदी @9 कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील (Talegaon Dabhade) भाजप सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त तळेगाव दाभाडे येथे शुक्रवारी (दि.9) मोदी @9 हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रदेश व जिल्हास्तरीय,मोर्चाचे अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख,बूथ अध्यक्ष,सर्व आघाड्यांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. राज्याचे पर्यटन, कौशल्य, उद्योजकता आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला यशस्वी 9 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे मोदी @9 ह्या अभियाना अंतर्गत प्रदेश व जिल्हास्तरीय, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष,सर्व आघाड्यांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी,कार्यकर्ता संमेलन मा.ना.मंगलप्रभात लोढा (मंत्री- पर्यटन, कौशल्य, उद्योजकता आणि महिला व बालविकास) यांच्या (Talegaon Dabhade) प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि 9 जून 2023 रोजी 9 वा 30 मि. वैशाली मंगल कार्यालय, तळेगाव दाभाडे येथे होणार आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्यमंत्री बाळा भेगडे व मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून, आमदार महेश  लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे हे उपस्थित राहणार आहेत.

प्रदेश व जिल्हास्तरीय,मोर्चाचे अध्यक्ष,शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहणे बाबत आवाहन करण्यात आले आहे. अशी माहिती लोकसभा संयुक्त मोर्चा संमेलन संयोजक वर्षा डहाळे, विधानसभा सयुंक्त मोर्चा संयोजक सायली बोत्रे व किरण राक्षे यांनी दिली आहे.

Pune : पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा देण्यासोबत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.