Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – तळेगाव विद्या प्रतिष्ठान संचलित कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन (Talegaon Dabhade) मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. लेझिम आणि पिरॅमिडच्या रचना विद्यार्थ्यांनी सादर केल्या.

कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे संस्थापक चंद्रकांत काकडे,अध्यक्ष संदीप काकडे,प्रमुख पाहुणे चार्टर्ड अकाउंटंट राहुल नेरकर, अतिथी संदीप घारे, सचिव प्रशांत शहा,संस्थेचे सदस्य सुभाष दाभाडे,खजिनदार गौरी काकडे,मंगलाताई काकडे,राजश्री म्हस्के व शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर उपस्थित होते.

Chinchwad : आदमी पार्टी तर्फे प्रजासत्ताक दिन आम उत्साहात साजरा

प्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे राहुल नेरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. झेंड्याला मानवंदना देऊन राष्ट्रगीत गायले. यानंतर विद्यार्थ्यांनी झेंडा (Talegaon Dabhade) गीत,राज्य गीत व समूहगीत याचे सादरीकरण केले. यानंतर विद्यार्थ्यांनी मार्च पास्ट याचे उत्तम प्रदर्शन केले. कार्यक्रमाचा उत्साह वाढवण्यासाठी लेझीम तसेच पिरामिडच्या वेगवेगळ्या रचना विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने सादर केल्या. यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह व जोश दिसून येत होता.

यावेळी प्रमुख पाहुणे चार्टर्ड अकाउंटंट राहुल नेरकर आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, की देशाचा विकास हा नागरिकांच्या देशा विषयी असणाऱ्या जबाबदारीवर आधारित आहे. संदीप घारे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी थोर क्रांतिवीर व देशभक्तांच्या कार्याचे स्मरण करताना राष्ट्रीय सणांचे महत्त्व विषद केले. भारताला स्वातंत्र्य मिळून शंभर वर्ष होईपर्यंत आपला भारत हा प्रगत देश असेल असे मनोगत शाळेच्या मुख्याध्यापिका मीना अय्यर यांनी कार्यक्रम प्रसंगी केले.

यावेळी प्राध्यापिका मनीषा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलांचे व गुणांचे कौतुक केले. यावर्षी शाळेमध्ये घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या शिक्षिका अश्विनी भट यांनी जाहीर केली. यावेळी शाळेच्या प्रांगणात सर्व विद्यार्थी व शिक्षक त्याचप्रमाणे पालकही बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीतील कुमारी तेजस्विनी पारगे व धानेश्वरी मूर्खंडी या विद्यार्थिनींनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.