Talegaon Dabhade : तळेगाव शहरात रविवारी शाही रथोत्सव

एमपीसी न्यूज – तळेगाव शहरातील जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी चातुर्मासानिमित्त विराजित (Talegaon Dabhade) असलेले गुरु भगवंत यांच्या सानिध्यामध्ये सुरू असलेला सिद्धी तप याची पचकावणी रविवारी (दि. 20) होत आहे. त्यानिमित्त कठोर तपस्या केलेल्या चाळीस जैन श्रावक व श्राविका यांची शाही रथयात्रा काढण्यात येणार आहे. ही रथयात्रा रविवारी सकाळी आठ वाजता जैन मंदिर तळेगाव दाभाडे येथून सुरू होणार आहे.
तळेगाव दाभाडे येथील जिरावाला जैन मंदिरामध्ये परोपकारी सम्राट आचार्य श्री ऋषभचंद्र सुरिश्वरजी महाराज साहेबांचे यांचे अज्ञानु वरती शिष्य पंचम वर्षीतप तपस्वी मुनीराज श्री पियुषचंद्र विजयजी महाराज साहेब, मुनिराज श्री रजतचंद्र विजयजी महाराज साहेब,मुनी श्री प्रितियशचंद्र विजयजी महाराज साहेब यांचा परमपथ चातुर्मास 2023 मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
तळेगाव शहरातील जीरावला पार्श्वनाथ जैन मंदिर या ठिकाणी चातुर्मासानिमित्त विराजित असलेले गुरु भगवंत यांच्या सानिध्यामध्ये सुरू असलेला सिद्धी तप याची पचकावणी उद्या रविवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी होत आहे त्यानिमित्त कठोर अशी तपस्या केलेल्या चाळीस जैन श्रावक व श्राविका यांची शाही रथयात्रा रविवारी सकाळी ठीक 8 वाजता जैन मंदिर तळेगाव दाभाडे येथून सुरू होणार आहे.

रथयात्रेचे आकर्षण उंट, घोडे, चांदीचा रथ, इंद्रध्वजा, विरमगावचे प्रसिद्ध शहनाई पथक, बँड पथक, ढोल लेझीम पथक, डीजे विशेष आकर्षण म्हणजे तपस्वींसाठी विंटेज कार मध्ये बसण्याची व्यवस्था केलेली आहे.
त्यासोबतच विविध प्रकारचे रथ यामध्ये सहभागी होणार आहेत.संसार सोडून संन्यासाकडे जाणाऱ्या कुमारी राणू पारसमजी चंडालिया यांची दीक्षा इंदोर येथे 18 डिसेंबर रोजी होणार आहे
उद्या होणाऱ्या रथयात्रेमध्ये विशेष वर्शिदान असेल संपूर्ण पुणे जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात जैन बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.या सर्व रथयात्रेची व्यवस्था श्री जिरवाला पार्श्वनाथ जैन मंदिराचे विश्वस्त व चातुर्मास समितीचे सर्व कार्यकर्ते करत (Talegaon Dabhade) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.