Pune : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाताचे प्रमाण घटले

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघाताचे प्रमाण घटले आहे. सहा महिन्यांच्या आकडेवरीचा विचार केला तर ( Pune) अपघाताचे प्रमाण 20 टक्क्यांनी तर प्राणांतिक अपघाताचे प्रमाण 42 टक्क्यांनी घटले आहे.

Talegaon Dabhade : तळेगाव शहरात रविवारी शाही रथोत्सव

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने वेगवेगळ्या स्तरांवर काम केले. सहा महिन्यांत पुण्यासह रायगड, पिंपरी चिंचवड, पनवेल आरटीओच्या वायुवेग पथकाने 24 तास कारवाई केली. डिसेंबर 22 ते मे 23 दरम्यान अपघाताचे प्रमाण घटले आहे.

सर्वांत जास्त कारवाई वेगाने धावणाऱ्या वाहनांवर झाली. 10 हजारांहून जास्त वाहने निर्धारित वेगापेक्षा अधिक वेगाने धावताना आढळून आल्याने त्यांच्यावर ( Pune) कारवाई करण्यात आली.

 

ही आहेत कारणे
1. निर्धारित वेगाइतके वाहन चालविणे
2. लेन कटिंग न करणे
3. वाहन चालविताना सीट बेल्ट वापरणे
4. वेगाबद्दल चालकांचे होणारे समुपदेशन

1) अपघातांचे घटलेले प्रमाण

कालावधी : एकूण अपघात प्राणांतिक अपघात मृत्यू

जानेवारी ते जुलै 2022 : 198886 109

जानेवारी ते जुलै 2023 : 160 68 88

टक्केवारी (घट) : 19 21 19

2) जुलै महिन्यात ४२ टक्के घटले

एकूण अपघात प्राणांतिक अपघात मृत्यू

जुलै 2022 : 251215

जुलै 2023 : 2577

टक्केवारी (घट) :04253

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.