Pune : कारागृह उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या कैद्यांसाठी पगार वाढ करण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज – राज्यभरातील कारागृहात बंदीस्त असेलेल्या (Pune) तसेच कारागृह उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने पगार वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

कुशल बंदी, अर्धकुशल बंदी, अकुशल बंदी, खुल्या वसाहतीतील बंद्यांना ही पगार वाढ मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे कारागृह विभाग पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

Pune : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अपघाताचे प्रमाण घटले

कारागृह उद्योगात काम करणाऱ्या कुशल बंद्याना प्रती दिवस 74 रुपये, अर्धकुशल बंद्याना 67 रुपये, अकुशल बंद्याना 53 रुपये तर खुल्या वसाहतीतील बंद्यांना 94 रुपये अशी भरघोस पगार वाढ देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व 60 कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये दैनंदिनपणे सरासरी सात हजार कैदी काम करत आहेत. यामध्ये पुरुष कैदी हे 6 हजार 300 व महिला बंदी 300 च्या आसपास (Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.