Today’s Horoscope 20 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 20 August 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग –

वार – रविवार.

20.08.2023.

शुभाशुभ विचार – ११ पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – विनायक चतुर्थी.

 राहू काळ – सायंकाळी 4.30 ते 6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल. 

आजचे नक्षत्र – हस्त.

चंद्र राशी – कन्या.

—————————————-

मेष – ( शुभ रंग- राखाडी )

नोकरदारांवर वरिष्ठांचा वरदहस्त राहील. यापूर्वीचे कष्ट करणी लागतील. पती-पत्नी मधील मतभेद आज दुपारनंतर निवळतील. आज तुमची तब्येत थोडी नरमच राहील.

वृषभ (शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात काही नवीन संधी चालून येतील. नवोदित कलाकार मिळालेल्या संधीचे सोने करतील. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची ही उत्तम साथ राहील.

मिथुन ( शुभ रंग- पांढरा)

व्यापार उद्योगास चांगली गती येईल. महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम राहाल. स्थावराचे अपुरे व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहावे.

कर्क (शुभ रंग- हिरवा)

ज्यात काही कळत नाही त्यात उगीचच डोकं घालू नका. अति आत्मविश्वासही नुकसानास कारणीभूत ठरेल. काही अति हुशार मंडळी भेटतील. आज जरा कमीच बोला.

सिंह (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवाल तर अनेक किचकट कामे सोपी होतील. आज गृहिणी पाहुण्याची उठबस आनंदाने करतील.

कन्या ( शुभ रंग- केशरी)

कार्यक्षेत्रात तुमच्या शब्दास मान राहील. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज कारण नसताना इतरांच्या भानगडीत तुम्ही लक्ष घालाल  प्रवासात खोळंबा संभवतो.

तूळ ( शुभ रंग- मरून)

आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आज एकाच्या भरोशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. आज फक्त स्वार्थाकडे लक्ष द्या. परमार्थ आज परवडणारा नाही.

वृश्चिक (शुभ रंग- निळा)

नोकरीच्या ठिकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकही आज तुमच्यापुढे नमते घेतील. संततीकडून महत्त्वाचे समाचार येतील.

धनु- (शुभ रंग- भगवा)

आज तुम्ही आपले अधिकार वापरून इतरांची कामे करू शकाल हाताखालच्या माणसांवर तुमचा वचक राहील विरोधकांनाही तुमच्या कामाची पद्धत आता आवडू लागेल.

मकर ( शुभ रंग- मोरपंखी)

नोकरी धंद्यात काही मनाविरुद्ध घटना घडल्याने नैराश्य येईल. पण हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. स्वतःवर संयम असू द्या. जेष्ठांना उपासनेची प्रचिती येईल.

कुंभ (शुभ रंग – चंदेरी)

आज उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असून मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. ज्येष्ठ मंडळींना आज सत्संगातून मनशांती मिळेल. आज कोणतेही धाडस करू नका.

मीन -(शुभ रंग – डाळिंबी)

सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या भागीदारीच्या व्यवहारात पारदर्शकता असलेली बरी. संध्याकाळी जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

शुभम भवतु.

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तु सल्लागार.

संपर्क – 9689165424

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.