Ladakh : मोठी बातमी; लडाखमध्ये जवनांच्या गाडीला अपघात; 9 सैनिकांना वीरगती

एमपीसी न्यूज : लडाखमधून एक मोठी बातमी (Ladakh) समोर आली आहे. कियारी शहरापासून 7 किमी अंतरावर झालेल्या एका वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या 9 जवानांचा मृत्यू झाला आहे. सैनिक कारू चौकीतून लेहजवळील कायरीकडे जात होते. शहीद जवानांपैकी एक जेसीओ (ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर) आणि उर्वरित 8 जवान आहेत.

भारतीय लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले की, एएलएस वाहन लेहहून न्योमाकडे काफिले जात होते. सायंकाळी 6 च्या सुमारास त्यांचे वाहन 7 किमी दरीत कोसळले. या गाडीत लष्कराचे 10 जवान होते. यापैकी नऊ जणांचा मृत्यू झाला. एकजण जखमी झाला. जखमी जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Maval : सोसायटीमधील रहिवश्यांच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ महिलेची पोलिसात धाव

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघातावर शोक व्यक्त  (Ladakh) केला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘लडाखमधील लेहजवळ झालेल्या अपघातात भारतीय लष्कराच्या जवानांच्या मृत्यूने मी दु:खी आहे. त्यांनी आमच्या देशासाठी केलेली अनुकरणीय सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमी जवानांना फील्ड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मी त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.