Weather Update : मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू – हवामान विभाग

एमपीसी न्यूज – मान्सून परतीचा प्रवासाला आजपासून (बुधवार, दि.06) सुरूवात झाली आहे. मान्सूनच्या परतीचा हा प्रवास राजस्थान व संलग्न गुजरातच्या काही भागातून झाला आहे. पुढील चोवीस तास गुजरातचा काही भाग, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश काही भाग परतीसाठी अनुकूल आहे. असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.

मान्सुनच्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्यानंतर, वातावरणातील आर्द्रता हळुहळू कमी झाली की, त्यानंतर हा प्रवास पुढच्या टप्प्यातून संपण्यासाठी वेळ लागत नाही. यामुळे 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस देशभरातून माघार घेतो. त्यानुसार या वर्षीही पावसाचा वायव्येतून सुरू झालेला प्रवास वेळेतच संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान पाच आक्टोबरपासून पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती. यानुसार राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.