Maval : सोसायटीमधील रहिवश्यांच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठ महिलेची पोलिसात धाव

एमपीसी न्यूज – सोलंकी कॉम्प्लेक्स सहकारी येथील (Maval) रहिवासी असणाऱ्या ज्य़ेष्ठ नागरिक सुनंदा बाळकृष्ण माहुलकर यांनी सोसायटीमधील नागरिकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून थेट पोलिसांकडे धाव घेतली आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस सहाय्यक आयुक्त पद्माकर घनवट यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

तक्रारीत सुनंदा बाळकृष्ण माहुलकर यांनी म्हटले आहे की, संस्था मर्यादित, सिटी सर्व्हे नंबर 514 व 515 सर्व्हे नंबर 37 ते 45 प्लॉट नंबर 409, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे – ता. मावळ, जि. पुणे येथील आमची वडिलोपार्जित जमीन आहे. आम्ही अनेक दशकापासून येथे आमच्या कुटूंबासमवेत राहत आहोत.

करारनाम्यानुसार हा करार झालेला आहे. यामध्ये सोसायटीमधील दोन्ही बाजूकडील रस्ते पायी जाण्या-येण्यासाठी माहुलकर कुटूंबाना कायमस्वरुपी देण्यात आलेला आहेत. तसेच सोसायटीमधील दोन्ही गाड्यांचे पार्किंग एक कवर पार्किंग आणि एक  पार्किंग माहुलकर कुटुंबाना देण्यात आलेले आहे.

तसेच दुकानामध्ये व गिरणीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या गिन्हाईकांना कोणाकडूनही त्रास होणार नाही असे सोळंकी कुटूंबाने तडजोड करारनामामध्ये तडजोड केलेली आहे. असे असताना देखील मागील दोन दिवसापूर्वी डोहिफोडे नामे व्यक्ती यांनी माझ्या मालकीचे असलेले दुकान बॉम्बे बर्गर येथे काम करणारे माझे सहकारी यांना दम भरला व “तुला तीन महिन्यामध्ये घालवतो मी, अगोदरच आधी चार घालवलेले आहे. तू किस झाड की पत्ती है, तुला पण नाही तीन महिन्यात घालवला तर नावाचा डोईफोडे नाही, तुला घालवल्यानंतर तुझ्या मालकाला व सोसायटीतील सर्व सभासदांना मी पार्टी देणार आहे, अशी धमकी दिली, असे माहुलकर यांनी तक्रारीत म्हंटले आहे.

Maharashtra : ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ उपक्रमाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

तसेच माझ्या दोन्ही मुलांना सोळंकी कुटूंबाने फसविले आहे. त्यांच्याकडून 25 लाख रुपये अकाउंट ट्रान्सफर घेतलेले आहेत व तुमच्या नावावर घर करून देतो असे सांगितले.  वास्तविकरित्या अदयाप पैसे घेऊन पावणे दोन वर्षे झाली  तरीही अदयाप देखील सोळंकी कुटुंबाने आम्हाला खरेदीखत करुन दिलेले नाही.

त्यांच्यावर त्वरीत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच (Maval)  सोळंकी कुटुंब व सोसायटीतील कुलकर्णी व डोईफोडे यांच्यापासून माझ्या मुलांना, सुनांना तसेच नातींना जिवीतास धोका निर्माण झालेला आहे. जर उदया परवा माझे काही बरेवाईट झाले किंवा माझ्या घरातील सभासदांना काही झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार सोळंकी कुटुंब व सोसायटीतील कुलकर्णी व डोईफोडे हे असतील, असा इशाराही सुनंदा बाळकृष्ण माहुलकर यांनी अर्जातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.