Talegaon Dabhade : अभिनेते क्षितिज दातेंना टिळक विजापूरकर पुरस्कार

एमपीसी न्यूज – मराठी चित्रपट धर्मवीर तसेच लोकमान्य टिळक मालिकेतील ( Talegaon Dabhade ) अभिनेते क्षितिज दाते यांना नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने टिळक – विजापूरकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच डॉ. सागर जोशी, प्रा. प्रितम अहिरे, सुधाकर ढोरे, प्रीती घुले यांना वर्षभरातील कामगिरी बद्दल शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे कार्यगौरव पुरस्कार 2023-24 ने सन्मानित करण्यात आले. सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार,संस्थेचे खजिनदार तसेच अभियांत्रिकीच्या कार्यकारी समितीचे चेअरमन राजेश म्हस्के यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संस्थेचे विश्वस्त महेशभाई शहा,मुख्य कार्यकारी संचालक डॉ. रामचंद्र जहागीरदार,प्राचार्य डॉ. विलास देवतारे,प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे, आगामी येणाऱ्या यारी चित्रपटातील कलाकार आदी मान्यवर उपस्थित होते.

Mahatma Jyoti Rao Phule : दलितांचे कैवारी महात्मा फुले

कला क्रीडा,शैक्षणिक आणि सांस्कृतिक यांची लयलूट असलेल्या विहंगम 2023-24  या कार्यक्रमाची सुरवात रंगमंच पूजनाने अभिनेते क्षितीज दाते यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी यारी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण  करण्यास आले. छोटे पुढारी दरोडे यांनी अतिशय गावरान संवाद साधून सर्वांची मने जिंकली.

टिळकांच्या मालिकेत टिळकांची भूमिका साकारत असताना टिळकांनी स्थापन केलेल्या या ऐतिहासिक नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळामध्ये टिळक – विजापुरकर पुरस्कार स्वीकारताना क्षितिज दातें यांनी कृतज्ञता व्यक्त केले. डॉ. सागर जोशी, प्रा. प्रितम अहिरे, सुधाकर ढोरे, प्रीती घुले यांना याप्रसंगी शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे कार्यगौरव पुरस्कार 2023-24 ने वर्षभरातील कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ. शेखर रहाणे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सतीश मोरे यांनी केले. विहंगम 2023-24  च्या नियोजनासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी प्रतिनिधींना परिश्रम ( Talegaon Dabhade ) घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.