Talegaon Dabhade : अकार्यक्षम मुख्याधिकाऱ्यांची बदली करा, आमदार सुनिल शेळके यांची मागणी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (Talegaon Dabhade) यांची बदली करण्याची मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी राज्याच्या नगरविकास विभागाला दिले आहे. पाणीपुरवठा,मुलभूत सुविधा,आरोग्य व्यवस्था,स्वच्छता आदींबाबत नागरिकांच्या तक्रारी येत असल्याने मुख्याधिकारी एन के पाटील यांची तात्काळ बदली करावी असे पत्र त्यांनी दिले आहे.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची बदली करण्याची मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी पत्राद्वारे नगरविकास विभागाकडे केली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद येथे मुख्याधिकारी पदावर एन.के.पाटील हे सध्या कार्यरत असून पाटील यांच्याबद्दल माझ्याकडे अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

तळेगाव दाभाडे शहरामध्ये सुमारे 80 हजार इतकी लोकसंख्या असून सद्यस्थितीत नगरपरिषद हद्दीमध्ये वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जात आहे.

पाणीपुरवठा तसेच मुलभूत सोयीसुविधा,आरोग्य व्यवस्था व स्वच्छतेच्या तक्रारी घेऊन सर्वसामान्य नागरिक नगरपालिकेमध्ये आल्यावर सदर गंभीर विषयांबाबत पाटील यांच्याकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे.

शहरामध्ये अनेक विकासकामे सुरु असून त्या कामांच्या पूर्ततेबाबत (Talegaon Dabhade) त्यांना अनेकदा सूचना करूनही सदर विषयाबाबत ते उदासीन असल्याचे निदर्शनास येत आहे.

यापूर्वीच्या मुख्याधिकाऱ्यांचे काम व पाटील यांची काम करण्याची पद्धत पाहता ती अत्यंत असमाधानकारक आहे.तरी अकार्यक्षम मुख्याधिकारी एन. के. पाटील यांची तातडीने बदली करण्यात यावी,अशी मागणी आमदार सुनिल शेळके यांनी पत्रात केली आहे.

Today’s Horoscope 10 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.