Talegaon Lockdown News : तळेगावात पोलिसांकडून सायकल पेट्रोलिंगला प्रारंभ

एमपीसीन्यूज : तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.15) पोलिसांकडून अत्याधुनिक सायकलवर पेट्रोलिंग सुरु करण्यात आले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सायकल पेट्रोलिंग करण्यासाठी अत्याधुनिक 8 सायकली देण्यात आल्या. या सायकलवरुन तळेगाव दाभाडे हद्दीतील वर्दळीचे चौक, तसेच गल्लीबोळात पेट्रोलिंग करताना मदत होणार आहे. सायकल पेट्रोलिंगमुळे पोलिसांचे आरोग्य तंदुरुस्त राहील व त्यांचा वेळ वाचेल. नागरिकांना वेळीच पोलिसांची मदत मिळेल.

पोलीस सायकलवर पेट्रोलिंग करत असल्याचे पाहून नागरिक ही सायकलचा वापर करत आहेत. सायकल पेट्रोलिंगचे उद्घाटन वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.लॉकडाऊनच्या काळात पोलीस वेळेत उपलब्ध होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी पोलीस निरीक्षक शहाजी पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक दुर्गानाथ साळी, दिगंबर अतिग्रे, पोलीस उप निरीक्षक दत्ताजी मोहिते, ज्ञानेश्वर झोल, महेश मतकर, अनिकेत हिवरकर, प्राजक्ता धापटे, कर्मचारी सतिश मिसाळ, बाबाराजे मुंडे, प्रशांत वाबळे, अमोल गोरे, रामदास बहिरट, स्वप्नील चांदेकर, महेंद्र रावते, रेणुका वायळ, प्रियांका सानप, प्रियांका नाईक, वर्षा मलघे, अर्चना पानसरे आदी उपस्थित होते.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले, सायकल पेट्रोलिंगमुळे प्रदूषण कमी होईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आरोग्य तंदुरुस्त राहील. सायकल पेट्रोलिंग उपक्रम सातत्याने सुरु राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.