Talegaon: दाभाडे आळीतील श्रीराम मंदिरात महाअभिषेक व महाआरती

एमपीसी न्यूज – अयोध्या येथील श्री राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून तळेगाव दाभाडे येथील दाभाडे आळीतील  श्रीराम मंदिरात प्रभू  श्रीरामचंद्राच्या मूर्तीना महाअभिषेक तसेच महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. श्री राम नवमी जन्मोत्सव समिती व श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सकाळी सात ते दुपारी सव्वाबारा या वेळेत श्रीरामाच्या मूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजता श्री राम नवमी जन्मोत्सव समिती व श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. 

_MPC_DIR_MPU_II

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून महाभिषेक व महाआरती करण्यात आली. तळेगावातील अनेक भाविक त्यावेळी उपस्थित होते. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनानिमित्त यावेळी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरावर रंगीत प्रकाशझोत सोडण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.